न्यूयॉर्क : प्रागैतिहासिक काळातील पंख असलेल्या व आकाशात उडणार्या सरड्यांना '' असे अनेक वेळा संबोधले जात असते. आता चिलीच्या अटाकामा वाळवंटात अशा 'फ्लाईंग ड्रॅगनचे जीवाश्म सापडले आहे.
16 कोटी वर्षांपूर्वी हा ड्रॅगन आकाशात भरार्या मारत होता. त्याच्या पंखांचा विस्तार दोन मीटर म्हणजेच 6.5 फुटांचा आहे. त्याचे दात पुढे आलेले व अणुकुचीदार होते. चीनमधील 'ड्रॅगन' या काल्पनिक प्राण्याशी मिळते-जुळते त्याचे रूपडे होते. त्यामुळेच 'ज्युरासिक' काळातील या प्राण्याला 'फ्लाईंग ड्रॅगन' असे म्हटले जाते.
डायनासोरच्या काळातील या प्राण्याचे नेमके कुळ व प्रजाती समजू शकलेली नाही. मात्र, तो 'र्हॅम्फोर्हायन्कोईडस्'मधील एक उपकूळ असलेल्या 'र्हॅम्फोर्हायन्चीनी' मधील असावा असे संशोधकांना वाटते. टेरॉसॉर्स म्हणजेच उडणार्या डायनासोरचे हेच दोन प्रमुख प्रकार आहेत.
त्यांची शेपूट लांब असे व चोचीऐवजी त्यांना दातांनी भरलेला मोठा जबडा असे. त्यांच्या सहाय्याने ते मासे व अन्य जलचरांची शिकार करीत असत. विषुववृत्ताखालील भागात प्रथमच अशा उडत्या सरड्याचे जीवाश्म आढळले आहे.