पॅराग्लायडिंग 
विश्वसंचार

पॅराग्लायडिंग करताना पक्षी बसला पायावर!

backup backup

रिओ डी जनैरो :  कधी कधी भलतेच प्रकार घडत असतात ज्यांची आपण कधीही कल्पनाही केलेली नसते. असाच एक प्रकार ब—ाझीलमध्ये घडला. तिथे एक व्यक्‍ती पॅराग्लायडिंग करीत होती. आकाशातून विहरत असताना या माणसाच्या जवळ उडणारा पक्षी आला. या पक्ष्याने पॅराग्लायडिंग करणार्‍या माणसाच्या बुटावरच 'लँडिंग' केले!

शेकडो फूट उंचीवर हा माणूस पॅराग्लायडिंग करीत होता. खाली हिरवे जंगल आणि इमारती दिसत होत्या. या दरम्यान एक उडणारा पक्षी त्याच्यासमोर आला आणि नंतर तो त्याच्या बुटावर उतरला. या माणसानेही गोंधळून न जाता पक्ष्याला हळूवारपणे गोंजारले, त्याच्या पंखांवरून हात फिरवला. हा पक्षीही चोचीने त्याच्या बुटाला स्पर्श करीत होता. या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियातही व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की 'गरूडासह उडणे'. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 30 हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले असून 18 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT