विश्वसंचार

पूर्ण वर्तुळाकार इंद्रधनुष्य!

Arun Patil

लंडन : इंद्रधनुष्यातील 'धनुष्य' हा शब्दच त्याच्या अर्धवर्तुळाकारामुळे आलेला आहे. धनुष्याच्या कमानीसारखी दिसणारी ही रचना मनमोहकच असते. आता अशा अर्धवर्तुळाकार नव्हे तर पूर्ण वर्तुळाकार इंद्रधनुष्याचेही छायाचित्र समोर आले आहे. हे छायाचित्र उत्तर नॉर्वेच्या लोफोटेन आयलंडच्या ओल्स्टिंडेन पर्वताचे आहे. ड्रोन कॅमेर्‍याच्या मदतीने येथे इंद्रधनुष्याचे वर्तुळ बनवून ते कॅमेर्‍यात कैद केले आहे.

नॉर्वेसारख्या आर्क्टिक वर्तुळातील अनेक देशांमध्ये आकाशात ऑरोरा किंवा नॉर्दन लाईटस् या नावाने ओळखला जाणारा रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा खेळ रंगत असतो.

सौरकण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकले की असा प्रकाश निर्माण होतो. आता नॉर्वेमध्ये ऑरोरा नव्हे तर अशा इंद्रधनुष्याने रंगत आणली आहे. नॉर्वे युरोप खंडाच्या उत्तरेतील असा देश आहे, जो बर्फाळ पर्वतराजी आणि हिमनद्यांसाठी ओळखला जातो.

सुमारे 54 लाख लोकसंख्येच्या या देशाच्या चहुबाजूने आकाशात ऑरोरा (नैसर्गिक रंगीत प्रकाश) आणि दोन्ही किनार्‍यांवर वसलेल्या लोकसंख्येचे विलोभणीय द़ृश्य पाहायला मिळते. उत्तर नॉर्वेच्या हॅमरफेस्ट शहरात मेपासून जुलै महिन्यादरम्यान सुमारे 76 दिवस सूर्यास्त होत नाही. त्यामुळे नॉर्वेला 'मध्यरात्रीच्या सूर्याचा देश' असे म्हणतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT