विश्वसंचार

पन्नास लाख रुपये खर्च करून बनवला ‘असा’ चेहरा!

अमृता चौगुले

रिओ डी जनैरो : आपण अमक्यासारखे दिसावे म्हणून प्लास्टिक सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी करणारे महाभाग जगाच्या पाठीवर अनेक आहेत. एखाद्या बाहुला किंवा बाहुलीसारखे दिसण्यासाठीही अनेक सर्जरी केलेले तरुण-तरुणी आहेत. आता ब—ाझीलमधील एका माणसाने चक्क सैतानासारखे दिसण्यासाठी आटापिटा केला आहे. त्याच्या या सैतानी महत्त्वाकांक्षेने त्याला पछाडून टाकले आणि त्याने अनेक शस्त्रक्रिया करून आपले रूप सैतानासारखे करून घेतले. गेली चौदा वर्षे हा सर्व खटाटोप करीत असताना त्याने 50 लाख रुपयांपेक्षाही अधिक खर्च केला आहे!
रेनिए नावाच्या या 38 वर्षांच्या माणसाने गेली चौदा वर्षे शरीरात अनेक बदल करवून घेतले. चेहर्‍यावर टॅटू बनवणे, जीभ दोन भागांमध्ये कापणे असे काही प्रकारही त्याने केले आहेत. कपाळावर दोन शिंगेही बनवण्यात आली आहेत. त्याला पाहून आता लहान मुलं घाबरतात. विशेष म्हणजे तो स्वतःही एका मुलाचा बाप आहे! त्याला आपल्या शरीरावर टॅटू बनवणे आणि स्वतःला भयानक बनवणे आवडते. त्याच्या देहाचा 70 टक्के भाग शाईने आच्छादित आहे. अलीकडेच तो एका प्रार्थनास्थळी गेला असता तेथून त्याला बाहेर हाकलून लावण्यात आले. लोक आता त्याला एक सैतान म्हणूनच पाहत आहेत!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT