विश्वसंचार

निद्रिस्त ज्वालामुखीही ठरू शकतात धोकादायक

backup backup

लंडन : ज्वालामुखी ज्यावेळी सक्रिय असतात, त्यावेळी ते मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे वायू वातावरणात सोडत असतात. यामुळे वातावरणात सल्फरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असते. सक्रिय ज्वालामुखींची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, दीर्घकाळापर्यंत सक्रिय नसलेले म्हणजेच निद्रिस्त ज्वालामुखींची जास्त चर्चा होताना दिसत नाही.

ज्वालामुखीसंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार सक्रिय ज्वालामुखीच्या तुलनेत निद्रिस्त असलेले ज्वालामुखी हे वातावरणात कितीतरी पटीने अधिक सल्फर सोडत असतात. जल-वायूसाठी हा एक चिंतेचा विषय ठरू शकतो. संशोधकांच्या मते, निद्रिस्त ज्वालामुखीमधून उत्सर्जन होणारे सल्फरचे प्रमाण अत्यंत कमी असते, असे वाटत होते. मात्र, ते आमच्या अपेक्षेपेक्षाही तीन पटीने जास्त सल्फर वातावरणात उत्सर्जित करत असतात. संशोधनाचा हा निष्कर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण, यामुळे जल आणि वायूची गुणवत्ता याबद्दलचे आकलन नव्याने करण्याची आवश्यकता भासू शकते.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील वातावरणीय संशोधक उर्सुला जोंगेब्लोएड यांच्या मते, ज्यावेळी निद्रिस्त ज्वालामुखींबाबत संशोधन करण्यात आले, त्यावेळी सल्फर एरोसॉल जास्त प्रमाणात उत्सर्जित होत असल्याचे निष्पन्न झाले. हे प्रमाण सक्रिय ज्वालामुखींमध्ये कमी होते. सक्रिय ज्वालामुखीच्या तुलनेत निद्रिस्त ज्वालामुखीतून बाहेर पडणारे सल्फर कधी कधी 30 पटीने जास्त असू शकते. दरम्यान, आजपर्यंत निद्रिस्त ज्वालामुखीतून होणारे सल्फरचे उत्सर्जन सॅटेलाईट कॅमेराबद्ध करू शकलेली नाहीत. यामुळेच त्यातून नेमके किती प्रमाणात उत्सर्जन होते, याची माहिती मिळू शकलेली नव्हती; मात्र याचा जल-वायूवर परिणाम होऊ शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT