वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने एका नव्या प्रकारच्या विमानाच्या डिझाईनचा खुलासा केला आहे. हे विमान 'पृथ्वीला वाचवू' शकते असा त्यांचा दावा आहे. त्यामुळेच त्याला 'सुपरहिरो' चित्रपट किंवा कादंबर्यांना शोभेल असेच नाव देण्यात आले आहे. हे नाव आहे 'एक्स-प्लेन' किंवा 'एक्स-66ए'. 'नासा' आणि 'बोईंग'दरम्यान 650 दशलक्ष डॉलर्सचा एक करार झाला आहे. त्यानुसार बनणार्या विमानांचा उद्देश एव्हिएशन इंडस्ट्रीला 2050 पर्यंत 'नेट झिरो' कार्बन इमिशनच्या (कार्बन उत्सर्जन) ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणे हे आहे. या अर्थाने ही विमाने पृथ्वीला वाचवणारी आहेत.
विमानाची निर्मिती, टेस्टिंग आणि त्याच्या आकाशातील उड्डाणाची जबाबदारी बोईंगची असेल; मात्र ते एखाद्या सामान्य व्यावसायिक विमानापेक्षा अगदीच वेगळे असेल. या प्रयोगात डायगोनल स्ट्रटस्ने स्थिर, लांब आणि पातळ पंख असतील, ज्यांना ट्रान्सोनिक ट्रस-बेस्ड विंग कॉन्सेप्टच्या रूपात जाणले जाते.
सोप्या शब्दांमध्ये सांगायचे, तर पंखांच्या खाली एक प्रकारचा स्टॅबलायझर लावलेला असतो ज्यामुळे असे वाटते की, त्यांच्या खाली पंखांचा आणखी एक सेट लावलेला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरला, तर आगामी काळात एक्स-प्लेन सध्याच्या व्यावसायिक विमानांची जागा घेऊ शकतील. 'नासा'चे अॅडमिनिस्ट्रेटर बिल नेल्सन यांनी सांगितले की, आमची नजर केवळ अन्य ग्रह व तार्यांवरच नाही, तर आपल्या आकाशावरही आहे. 'एक्स-66 ए' एव्हिएशनच्या भविष्याला आकार देण्यासाठी मदत करील. एक असे युग येईल जिथे विमाने अधिक 'ग्रीन, क्लीन आणि शांत' होतील