विश्वसंचार

नारळपाणी लाभदायक, असतात ‘हे’ गुण

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली : जगभर गुरुवारी 'जागतिक नारळ दिवस' साजरा झाला. दरवर्षी 2 सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. नारळाच्या झाडाला आपल्याकडे 'कल्पवृक्ष'च म्हटले जाते, याचे कारण त्याच्या सर्वच भागांचा विविध कारणांसाठी उपयोग होत असतो. विशेषतः नारळपाणी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते.

तज्ज्ञांनी म्हटले आहे की नारळपाण्यात 'क' जीवनसत्त्व, मॅग्‍नेशियम आणि पोटॅशियम असते जे रक्‍तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. नारळपाण्यात कॅलरीज कमी असल्यामुळे वजन कमी करीत असताना त्याचा उपयोग होतो. नारळपाण्यामुळे जंकफूड खाण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

नारळपाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते. शरीरातील पाण्याचे प्रमाण नारळपाण्यामुळे नियंत्रित राहते. झोप चांगली येण्यासाठीही रात्रीच्या जेवणानंतर नारळपाणी ठेवणे लाभदायक ठरू शकते. नारळपाण्यात अनेक अँटिऑक्सिडंटस्, अमिनो अ‍ॅसिड, एन्झाईम्स, बी-कॉम्प्लेक्स असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते.

SCROLL FOR NEXT