विश्वसंचार

नवी अंतराळ दुर्बीण करणार बाह्यग्रहांचे निरीक्षण

Arun Patil

वॉशिंग्टन : 'नासा'च्या 'हबल' या अंतराळ दुर्बिणीमध्ये तीस वर्षांच्या सेवेनंतर आता सातत्याने बिघाड निर्माण होत आहेत. त्यामुळे सध्या 'नासा'ने तिच्या 'उत्तराधिकारी'ला लाँच करण्याची तयारी केली आहे. या बहुप्रतीक्षित 'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप'ला याचवर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच केले जाऊ शकते.

दहा अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 75 हजार कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या या दुर्बिणीच्या मदतीने पृथ्वीपासून 63 प्रकाशवर्ष अंतरावरील ग्रहांपैकी एका प्रणालीचे निरीक्षण करण्याची योजनाही बनवण्यात आली आहे.

या 'बेटा पिक्टोरीस' सिस्टीममध्ये किमान दोन ग्रह आहेत. याशिवाय अन्यही काही अवकाशीय शिळा त्याठिकाणी आहेत. तसेच एक धुळीची तबकडीही आहे. या संशोधनातून तेथील धुळीचा अभ्यास केला जाईल. या मार्गाने आकाशगंगेलाही नव्याने समजून घेतले जाईल.

कारण यामध्ये वेगवेगळे धूमकेतू, लघुग्रह आणि विभिन्न आकाराच्या अवकाशीय शिळा तसेच धूळ असते जी तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालते.

'नासा'च्या गॉडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरच्या ख्रिस स्टार्क यांनी सांगितले की, या ग्रहप्रणालीला नव्या अंतराळ दुर्बिणीच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी संशोधक उत्सुक आहेत.

स्टार्क आणि त्यांची टीम जेम्स वेबच्या कोरोनाग्राफचा अभ्यास करील. त्यापासून तार्‍याच्या प्रकाशाला 'ब्लॉक' करून धुळीने भरलेल्या तबकडीचे निरीक्षण करता येईल.

SCROLL FOR NEXT