विश्वसंचार

धूमकेतूचे अवशेष पृथ्वीजवळ येणार

backup backup

हेलसिंकी : पृथ्वीजवळून सातत्याने अनेक खगोलीय पिंड जात असतात. मात्र, यामध्ये लघुग्रह आणि उल्कापिंडाचे सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल. कारण, त्याचा प्रभाव कधी कधी आपल्या सूर्यमालेवरही दिसून येत असतो. धूमकेतू हे काहीवेळा 70 ते 100 वर्षांमध्ये एकदाच सूर्याच्या जवळ येतात. त्यांची कक्षा फारच मोठी असते. दरम्यान, सुमारे 23 वर्षांपूर्वी '17 पी/होल्मस'नामक धूमकेतूला हबलने पहिल्यांदा पाहिले होते. मात्र, 2007 मध्ये या धूमकेतूचा भीषण स्फोट झाला. आता त्याचे धुळीचे कण पृथ्वीजवळ येत आहेत.

ज्यावेळी 17 पी/होल्मसचा स्फोट झाला होता, त्यावेळी तो काही क्षणांसाठी सूर्यमालेतील सर्वात मोठा खगोलीय पिंड असल्यासारखे वाटले होते. याशिवाय त्याची चमक लाखो पटीने वाढली होती. त्यानंतर स्फोटातून तयार झालेली धूळ, राख आणि वायू आपल्या सूर्यमालेच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचले होते. आता हे सर्व काही याचवर्षी पृथ्वीच्या आकाशात दिसून येणार आहे.

'मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल एस्ट्रानॉमिकल सोसायटी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी सांगितले की, 17 पी/होल्मसच्या भीषण स्फोटानंतर धुळीची एक मोठी रेषा तयार झाली. आता हीच धूळ आता पृथ्वीवरून दिसणार आहे. यासाठी टेलिस्कोपचा वापर करावा लागणार आहे. मुख्य संशोधिका मारिया ग्रिटसेविच यांनी सांगितले की, 17 पी/होल्मसच्या स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात धुळीचे कण तयार झाले होते आणि ते त्याच्या कक्षेत दीर्घ अंतरापर्यंत विखुरले गेले होते. आता हेच कण पृथ्वीवरून दिसतील.

SCROLL FOR NEXT