न्यूयॉर्क : जगभरातील काही बेटं, किनारे स्वतःच्या वेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. समुद्रकिनारा म्हटलं की मऊशार रेती, शंख, शिंपले व कधी कधी जलचरांचे अवशेषही आढळून येतात. मात्र, अमेरिकेत एक समुद्रकिनारा असा आहे जिथे लाटांबरोबर चक्क भयानक बाहुल्या वाहून येतात!
दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील टेक्सासमध्ये किनार्यावर अत्यंत रहस्यमय अशा बाहुल्या वाहून येण्यास सुरुवात झाली. टेक्सास युनिव्हर्सिटीच्या मरीन सायन्स इन्स्टिट्यूटला या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी याबाबत शोध घेतला. त्यांनी या संशोधनाला 'मिशन-अरनास रिझर्व्ह' असे नाव दिले. या मोहिमेतील संशोधकांना 64 किलोमीटर अंतरावर असलेल्या किनार्यावर डझनभर बाहुल्या सापडल्या. त्यानंतर संशोधकांच्या टीममधील एका सदस्याने सांगितले, या बाहुल्या खूप भीतीदायक आणि रहस्यमय दिसत होत्या. त्यांच्या डोळ्यातून विचित्र बार्नेकल्स येत राहतात.
बार्नेकल्स हे आथर्—ोेपॉडचा एक प्रकार आहे जे समुद्रात राहतात. जेस टनेल नावाच्या संशोधकाने सांगितले ज्या बाहुल्यांच्या डोक्यावर केस नसतात त्या सर्वात विचित्र आणि भयानक दिसतात. दरम्यान, या बाहुल्या कुठून येतात, हा प्रश्न अजूनही कायम आहे.