विश्वसंचार

डार्क एनर्जीमुळे घडू शकतात आणखी ‘बिग बँग’

Arun Patil

वॉशिंग्टन : एका महाविस्फोटानंतर ब्रह्मांडाची निर्मिती व विकास झाला असे मानले जाते. या महाविस्फोटालाच 'बिग बँग' असे म्हणतात. असा दुसरा, तिसरा किंवा चौथा 'बिग बँग'ही भविष्यात घडू शकतो व त्याचे कारण डार्क एनर्जी हे आहे, असे आता खगोल शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. अंतराळातील सर्वात गूढ गोष्टींमध्ये या 'डार्क एनर्जी'चा समावेश होतो.

प्रत्येक क्षणाला ज्या रहस्यमय घटनेमुळे ब्रह्मांडाचा अधिकाधिक विस्तारच होत जातो ती 'डार्क एनर्जी' म्हणून ओळखली जाते. तिचे स्वरूप समजून घेण्यासाठी एक नवा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामधून संशोधकांनी असे म्हटले आहे की, कॉस्मिक एक्सप्लोजन किंवा महाविस्फोट ही केवळ एकदाच घडण्यासारखी बाब नाही. वास्तवात डार्क एनर्जी काही काळानंतर 'स्विच ऑन' किंवा 'स्विच ऑफ' होऊ शकते. कधी कधी ब्रह्मांडाचा विस्तारही होतो तर कधी ते आकसूनही जाते.

हे आकसणे तोपर्यंत सुरू राहते जोपर्यंत नव्या 'बिग बँग'साठी अनुकूल स्थिती निर्माण होत नाही. त्यामधून पुन्हा नव्या सृष्टीचे सृजच घडते. अशी घडना वारंवार घडू शकते. ब्रह्मांडाचा विस्तार सतत घडत असतो. (संस्कृतमध्ये 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थही 'वृद्धी पावणारा' किंवा विस्तारणारा असाच आहे!) त्याच्या विस्तारण्याच्या या गतीचे नेमके कारण समजलेले नाही. त्यालाच संशोधक 'डार्क एनर्जी' म्हणतात.

SCROLL FOR NEXT