विश्वसंचार

डायनासोरचे हरवलेले जीवाश्म पुन्हा ‘असे’ सापडले

Arun Patil

लंडन : एका प्राचीन सागरी सरिसृपाचा पहिला पूर्ण सांगाडा 1941 मध्ये लंडनवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात नष्ट झाला असे मानले जात होते. हा बहुमूल्य सांगाडा कायमचा मानवी नजरेपासून दूर झाला अशी हळहळ व्यक्त होत असे. मात्र, आता एका अनोख्या पद्धतीने वैज्ञानिकांना या सांगाड्याचा नव्याने शोध लावला आहे. अर्थातच मूळ जीवाश्माचा हा शोध नसून त्याच्या प्लास्टर ऑफ पॅरिसचा कास्टचा आहे.

जीवाश्म वैज्ञानिक मेरी एनिंग यांनी 1818 मध्ये इचिथ्योसोरचे जीवाश्म शोधले होते. त्याच्या दोन दशकापूर्वी 'डायनासोर' शब्द आपल्या शब्दकोषाचाही हिस्सा होता. प्राचीन सागरी सरिसृप इचिथ्योसोरला 'मत्स्य सरडा' असे संबोधले जात असे. याचे कारण म्हणजे या जीवामध्ये मासा आणि सरडा किंवा पाली अशा दोन्हीचे गुण होते. एनिंगला जे जीवाश्म सापडले होते ते 19 कोटी ते 19.5 कोटी वर्षांपूर्वीचे होते.

मँचेस्टर युनिव्हर्सिटीतील जीवाश्म वैज्ञानिक डॉ. डीन लोमॅक्स यांनी सांगितले की त्या काळापर्यंत कोणत्याही प्रागैतिहासिक सरिसृप जीवाश्माचा पहिला पूर्ण सांगाडा असणेही याला अधिक खास बनवत असे. या जीवाश्मातील खरी हाडे तर पूर्वीच नष्ट झालेली आहेत; पण आता पुन्हा एकदा अशी संधी मिळाली आहे ज्यामुळे हे जीवाश्म आपल्याला पुन्हा मिळू शकते. या सांगाड्याचे दोन प्लास्टर ऑफ पॅरिसचे कास्ट बनवण्यात आले होते, मात्र त्यांचे कोणतेही रेकॉर्ड नोंदवले गेले नव्हते.

मात्र, आता ते नुकतेच अपघाताने सापडले. एनिंग इंग्लंडच्या लाइम रेजिसमध्ये वाढले जे आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा एक भाग आहे. याठिकाणी आजही जीवाश्म सापडत असतात. एनिंग आणि त्यांचा मोठा भाऊ जोसेफने हे जीवाश्म शोधले होते. सन 1819 मध्ये ब्रिटिश सर्जन सर एडवर्ड होम यांनी त्याचे अध्ययन केले आणि त्यामधून निघालेले निष्कर्ष प्रकाशित केले. 1820 मध्ये लेफ्टनंट कर्नल थॉमस जेम्स यांनी एनिंगला वित्तीय मदत देण्यासाठी त्याला रॉयल कॉलेज ऑफ सर्जनला विकले. दुसर्‍या महायुद्धापर्यंत ते तिथेच होते असे मानले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT