विश्वसंचार

झॉम्बी कबूतर

Arun Patil

लंडन : कबूतरांना नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या विषाणूची लागण झाल्यावर कबूतर 'झॉम्बी' बनत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कबूतरांवर पॅरामिक्सोव्हायरस या आजाराचे संकट कोसळले आहे.

या रोगाची लागण झाल्यावर कबूतर एखाद्या 'झॉम्बी'प्रमाणे वागू लागते म्हणून काही नेटकर्‍यांनी या कबूतरांचा 'झॉम्बी कबूतर' असा उल्लेख करत आहेत. झॉम्बी म्हणजे मेंदूवरील संतुलन राहत नाही, त्यामुळे तोल सांभाळणे कठीण होते.

कबूतरांवरील हा नवा आजार ब्रिटनमध्ये पसरल्याचे सांगण्यात येत आहेत. 'झॉम्बी'मुळे कबूतराची उडण्याची क्षमताही निघून जाते. कबूतराचे मानेवर नियंत्रण नसणे आणि उडण्याची शक्ती नसणे, तसेच पंख आणि पाय थरथर कापणे अशी लक्षणे झॉम्बी रोगाची आहेत. न्यू जर्सीमध्येही या विषाणूची लागण झाल्याने काही कबूतरांचा मृत्यू झाला आहे. सध्या या विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही.

SCROLL FOR NEXT