विश्वसंचार

जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीने तीन आकाशगंगांचा पाहिला ‘जन्म!’

Arun Patil

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी प्रथमच जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने सुरुवातीच्या काळातील तीन आकाशगंगांचा शोध लावला आहे, ज्या त्यावेळी निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये होत्या. एका अर्थी या तीन आकाशगंगा जन्म घेत असताना, जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीने पाहिले आहे.
याबाबतच्या संशोधनाची माहिती 'सायन्स' या नियतकालिकात देण्यात आली आहे. 'बिग बँग' असे नाव असलेल्या महाविस्फोटानंतर ब्रह्मांडाची निर्मिती झाली, असे मानले जाते. या 'बिग बँग'नंतर 40 कोटी ते 60 कोटी वर्षांनंतर हायड्रोजन आजण हेलियम वायूंच्या 'उत्पादक' ढगांपासून या तीन नवजात आकाशगंगा जन्म घेत असतानाचे द़ृश्य आता दिसले आहे. इतक्या वर्षांनंतर तेथून निघालेले प्रकाशकिरण आता जेम्स वेबपर्यंत पोहोचले आहेत. या संशोधनामुळे सुरुवातीचे तारे व आकाशगंगा अंधाराला भेदून ज्या काळात उदयास आल्या, त्या 'इरा ऑफ रिआयोनायझेशन' या नावाने ओळखल्या जाणार्‍या काळाबाबतची माहिती मिळणे शक्य होईल. कोपेनहेगन युनिव्हर्सिटीच्या कॉस्मिक डॉन सेंटरमधील कॅस्पर हिंझ यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

SCROLL FOR NEXT