केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेच्या सागरी किनार्यावर सुमारे 11 फूट लांब दैत्याकार जीव पाहून लोकही भयभीत झाले. दुर्दैवाने हा महाकार सागरी जीव किनार्यावरील रेती मृतावस्थेत पडला होता. त्याला रेजरसारखे असलेले दात पाहून एकच दहशत निर्माण झाली.
मृतावस्थेत सापडलेला हा जलचर म्हणजे महाकाय 'स्क्विड' होता. हा जीव यापूर्वी 2006 मध्ये शेवटचा दिसला होता.
यासंदर्भात शास्त्रज्ञांनी सांगितले की, पूर्णपणे विकसित झालेला 'स्क्विड' हा तब्बल 43 फूट लांब असू शकतो. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या किनारी सापडलेला हा स्क्विड अत्यंत लहान वयाचा होता. तरीही त्याची लांबी 11 फूट 5 इंच इतकी होती. हा मृत जीव पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यापैकी स्थानिक निवासी असलेल्या अॅली पॉल्सने सांगितले की, हा भला मोठा मृतावस्थेतील जलचर पाहून डोळ्यावर विश्वासच बसत नाही. हा खरोखच जीवनातील एक वेगळा अनुभव होता. त्याच्या लांबलचक हातावर धारधार असलेले दात पाहून मनात एक प्रकारची भीतीच दाटून आली.
शास्त्रज्ञांच्या मते, स्क्विड हा जलजर आपल्या दातांचा वापर स्पर्म व्हेलच्या हल्ल्यातून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी करतो. तर एका मच्छीमाराने सांगितले की, हा सागरी जीव मृतावस्थेत पाहून दुःख झाले. तर काही मच्छीमारांच्या मते, असे जीव मृतावस्थेत आढळले ही बाब अशुभ ठरू शकते.