टोकिओ : आपल्या कोणत्याही ब्रँडचा प्रसार करून सध्या जाहिरातीसाठी अनेक फंडे वापरले जातात. ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी हे सर्व काही केले जाते. अशाच एका अनोख्या रेस्टॉरंटबाबत आपण जाणून घेणार आहोत. जपानमध्ये असे एक रेस्टारंट आहे, याठिकाणी तुम्हाला जेवण प्लेटऐवजी डायनिंग टेबलवर झोपलेल्या न्यूड तरुणीच्या शरीरावर वाढले जाते. अशी अनेक रेस्टॉरंटस् जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. या प्रकाराला बॉडी सुशी म्हटले जाते. जपानप्रमाणेच बॉडी सुशी असलेली हॉटेल्स अनेक देशांमध्ये आहेत. मात्र, चीनमध्ये अशा प्रकारच्या हॉटेलवर बंदी घालण्यात आली आहे.
ग्राहकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी या अजब आणि विचित्र पद्धतीमुळे या रेस्टॉरंटस्मध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या पद्धतीमध्ये डायनिंग टेबलवर तरुणीला झोपवल्यानंतर रेस्टॉरंटस्मधील स्टाफ कौशल्याने तिच्या शरीरावर भोजन सजवतो. न्योटाइमोरी एक्सपिरियन्स नावाचा हा रेस्टॉरंट जपानची राजधानी टोकियोमध्ये आहे. येथे पूर्णपणे न्यूड महिलांच्या शरीरावर भोजन वाढले जाते.