विश्वसंचार

जपानजवळ आढळला 8 फूट लांबीचा स्क्वीड

Arun Patil

टोकियो : जपानजवळ समुद्रात एका डायव्हरला तब्बल 8.2 फूट लांबीचा म्हणजेच 2.5 मीटरचा महाकाय स्क्वीड आढळून आला. फिकट तांबड्या व पांढर्‍या रंगाचा हा स्क्वीड अत्यंत दुर्मीळ असाच आहे.

टोयूका सिटीत पत्नीसमवेत 'टी-स्टाईल' नावाचे डाईव्ह रिसॉर्ट चालवणार्‍या योसुकी तानाका यांना असा स्क्वीड 'याचि देही याचि डोळा' पाहण्याची संधी मिळाली. त्यावेळी एका स्थानिक फेरीमॅनने त्यांना किनार्‍यापासून जवळच एक मोठा स्क्वीड असल्याची माहिती दिल्यावर ते तत्काळ पाण्यात उतरले होते. किनार्‍यापासून जवळच समुद्राच्या पृष्ठभागालगत हा महाकाय स्क्वीड आरामात पोहत चालला होता.

महासागरातील सर्वात रहस्यमय जलचरांपैकी एक असलेल्या या स्क्वीडचे त्यांनी फोटो टिपून घेतले व त्याविषयी ब्लॉगही लिहिला. तो इतका मोठा होता की त्याच्याजवळ पोहोत असताना मला भीतीही वाटली, असे त्यांनी म्हटले आहे. असे जायंट स्क्वीड सहसा खोल महासागरात असतात. केवळ त्यांचा मृतदेह किनार्‍यावर वाहून आल्यावरच ते पाहायला मिळतात. ते 40 ते 45 फूट लांबीपर्यंतही वाढू शकतात असे म्हटले जाते.

SCROLL FOR NEXT