विश्वसंचार

जगातील सर्वात महागडे सँडविच

Arun Patil

न्यूयॉर्क : काही वेळा खाद्यपदार्थांच्या किमतींमुळेही विक्रम घडत असतात. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील 'सेरेंडिपीटी 3' या रेस्टॉरंटमध्ये जगातील सर्वात महागडे सँडविच मिळते. त्याची नोंद गिनिज बुकमध्येही झाली आहे. या सँडविचची किंमत भारतीय चलनात तब्बल 17 हजार रुपये आहे.

या रेस्टॉरंटने आधीही अनेक विक्रम नोंदवलेले आहेत. तिथे महागडे डेझर्ट, हॅम्बर्गर, वेडिंग केकही आहे ज्यांचा विश्वविक्रम झालेला आहे. आता त्यामध्ये या सँडविचचीही भर पडली आहे. या सँडविचचे नाव 'क्विंटेसेंशियल ग्रील सँडविच' असे आहे. त्यामध्ये दुर्मीळ आणि महागड्या पदार्थांचा वापर केला जातो.

या सँडविचमध्ये फ्रेंच ब्रेडचे दोन तुकडे वापरले जातात जे डोम पेरिग्नॉन शॅम्पियन आणि खाण्यायोग्य सोन्याच्या फ्लेक्ससह बनवलेले असतात. यामध्ये पांढरे ट्रफल बटर लावले जाते आणि सोबतच ब्रेड कोसिओकाव्हलो पोडोलिको चीज पसरवले जाते. तसेच दक्षिण आफ्रिकन लॉबस्टर टोमॅटो बिस्क डिपिंग सॉससह बॅकरॅट क्रिस्टल प्लेटवर ते दिले जाते. हे सँडविच खायचे असेल तर त्याची ऑर्डर 48 तास आधी म्हणजे दोन दिवस आधीच द्यावी लागते. यामधील चीज इटलीतील खास प्रजातीच्या गायींच्या दुधापासून बनवलेले असते. या गायी वर्षातून केवळ दोनच महिने दूध देतात!

SCROLL FOR NEXT