बीजिंग : चीन च्या संशोधकांनी जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर बनवला आहे. तो सध्याच्या सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटरच्या तुलनेत दहा लाख पटीने अधिक शक्तिशाली आहे. चीन अजूनही अशा क्वांटर कॉम्प्युटर्सवर काम करीत असल्याचे म्हटले जाते. हे कॉम्प्युटर अशा सर्व गोष्टी करण्यास सक्षम असतात ज्याची माणूस कल्पनाही करू शकणार नाही!
चीनच्या नॅशनल सुपर कम्प्युटिंग सेंटरने दावा केला आहे की संस्थेने जगातील पहिला 'एक्साफ्लॉप' क्वांटम कॉम्प्युटर बनवला आहे. चिनी वैज्ञानिकांनी अनेक वर्षे या कॉम्प्युटरला जगापासून लपवून ठेवले. मात्र, आम्ही जगातील कोणत्याही सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटरच्या तुलनेत 100 ट्रिलियन पटीने अधिक वेगाने गणना करण्यास सक्षम आहोत असे सांगितले. वैज्ञानिकांनी एका अध्ययनात म्हटले आहे की आमचे लक्ष्य पूर्ण झाल्याचे अनुमान आहे.
आमच्या 'जूचोंगझी' कॉम्प्युटरने जे काम केवळ 1.2 तासांमध्ये पूर्ण केले ते करण्यासाठी जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटरला किमान आठ वर्षे लागली असती. क्वांटम कॉम्प्युटर्स हे ब्रह्मांडातील सर्वात सूक्ष्म कणांचा वापर करतात ज्यामुळे ते 'क्वांटम' अवस्थेला प्राप्त करतात.