विश्वसंचार

चक्‍क द्राक्षे पॉपकॉर्न!

Shambhuraj Pachindre

लंडन : सोशल मीडियात अनेक भलत्याच रेसिपीही पाहायला मिळत असतात. शेवयाच्या खीरीच्या धर्तीवरची 'नूडल्सची खीर'ही पाहून अनेक लोक धन्य झाले असतील! आता द्राक्षांच्या चवीचे पॉपकॉर्न कसे तयार करावेत याचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. या रेसिपीत चक्‍क द्राक्षांचा घडच उकळत्या तेलात टाकला जातो व नंतर पॉपकॉर्न तळण्यासाठी टाकले जातात!

आतापर्यंत आपण अनेक फ्लेवरचे पॉपकॉर्न पाहिले असतील. क्लासिक पॉपकॉर्न, मसाला पॉपकॉर्न, पेरी-पेरी पॉपकॉर्न, कार्मेल चॉकलेटपासून ते अगदी फ्रूट पॉपकॉर्नपर्यंत अनेक प्रकारचे पॉपकॉर्न असतात. मात्र, द्राक्षांचे पॉपकॉर्न यानिमित्ताने पहिल्यांदाच पाहायला मिळाले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्‍ती पॅनमध्ये गरम तेलात द्राक्षे टाकत असताना दिसते. त्यामुळे तेलाला अर्थातच हिरवा रंग येतो. या तेलात एक अख्खे पाकीट पॉपकॉर्न टाकले जातात. त्या फुलून वर येतात आणि हिरवट रंगाच्या पॉपकॉर्नने कढई भरून जाते. द्राक्षे तेलात तळणे ही कल्पनाही एरव्ही आपण करणार नाही; पण यानिमित्ताने तेही पाहायला मिळाले आहे!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT