विश्वसंचार

गळ सोडून गळ्यात घुसला मासा!

backup backup

बँकॉक ः या जगात कधी काय घडेल हे काही सांगता येत नाही. कधी कधी भलतेच चक्रावून टाकणारे प्रसंग घडत असतात. आता थायलंडमध्ये एका मच्छीमाराच्या गळाला लागलेला मासा चक्क गळ सोडून मच्छीमार्‍याच्या गळ्यातच घुसल्याची घटना घडली आहे! ही घटना थायलंडच्या फथालुंग येथे घडली. तिथे हा मच्छीमार गळ टाकून मासे पकडत होता. त्याच्या गळाला एक मासा लागल्यावर तो या माशाला गळातून बाहेर काढू लागला.

त्यावेळी धडपडणार्‍या माशाने अचानक उसळी घेतली आणि तो 'आ' वासून काम करीत असलेल्या या माणसाच्या तोंडात जाऊन पडला. बुळबुळीत असल्याने तो लगेचच घशाखाली निसटला आणि तिथेच अडकला. त्यामुळे या माणसाचा श्वास कोंडला आणि शिकार्‍याचीच शिकार होण्याची वेळ आली! अशावेळी लोकांनी त्याला तत्काळ एका सरकारी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हा मासा बाहेर काढला. पाच इंचाचा हा मासा त्याच्या घशात अडकलेला पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. असे प्रकरण आम्ही पहिल्यांदाच पाहिल्याचे त्यांनी सांगितले!

SCROLL FOR NEXT