विश्वसंचार

गर्भवती महिला वेटरला दिली लाखाची टिप!

Arun Patil

वॉशिंग्टन : काही घटना अशा असतात ज्या आपल्या मनाला हळवा स्पर्श करून जातात. अशाच घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून जगभरातून या व्हिडीओचं कौतुक होत आहे. ही घटना अमेरिकेतली असून काही मित्र एका हॉटेलमध्ये ख्रिसमस पार्टी करण्यासाठी आले होते. पार्टी केल्यानंतर या मित्रांनी एक असं काम केलं ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात होत आहे. महिला वेटर गर्भवती असल्याचे समजताच या सर्वांनी तिला सुमारे 1 लाख रुपयांची टिप दिली!

अमेरिकेतल्या पेन्सिलवेनिया इथल्या एका हॉटेलमध्ये जेमी मायकल नावाचा एक व्यक्ती आपल्या मित्रांसोबत ख्रिसमस निमित्ताने पार्टी करण्यासाठी आला होता. या हॉटेलमध्ये महिला वेटर्स काम करतात. यातलीच एक महिला वेटर मायकल आणि त्याच्या मित्रांना सर्व्हिस देत होती. पार्टीदरम्यान मायकल आणि त्याच्या मित्रांना ती महिला वेटर गर्भवती असल्याचे कळले. यानंतर या सर्व मित्रांनी जे केलं ते खरंच कौतुकास्पद होतं. मायकल आणि त्याच्या मित्राने आपापसात काही पैसे गोळा केले.

अ‍ॅश्ले बॅरेट या महिला वेटरला या मित्रांनी तब्बल 1300 डॉलर्स म्हणजे सुमारे 1 लाख 10 रुपये टिप दिली. अ‍ॅश्ले बिल देण्यासाठी आली तेव्हा मायकल आणि त्याच्या मित्रांनी तिला 1300 डॉलर्सची टिप तिच्या हातात ठेवली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मायकलने इतक्या रकमेची टिप देताच सुरुवातीला अ‍ॅश्लेने नकार दिला; पण मायकलने तिला टिप घेण्याची विनंती केली. यानंतर अ‍ॅश्ले भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.

तिने भावून होत मायकलला मिठी मारली. याआधी सर्वाधिक टीप किती मिळाली होती, असा प्रश्न मायकलने अ‍ॅश्लेला विचारला. यावर तिने 100 डॉलर्सची टिप मिळाल्याचे सांगितले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अ‍ॅश्लेला आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अनेक जण तिला प्रत्यक्ष भेटून तिची मदत करत आहेत. शिवाय मायकल आणि त्याच्या मित्रांचेही लोक कौतुक करत आहे. अशाच चांगल्या लोकांमुळे जगात अजूनही माणुसकी शिल्लक असल्याच्या प्रतिक्रिया काही जण व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT