विश्वसंचार

insects : कीटकांनाही होतात वेदना!

Arun Patil

लंडन : पशू-पक्षी किंवा अगदी वनस्पतींबाबतही संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे असते. वनस्पतींनाही संवेदना असतात, हे आपल्याच जगदिशचंद्र बोस यांनी जगाला दाखवून दिले होते. (insects) एरव्ही आपण किड्यांकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही, अनेक लोक सहजपणे किडे मारत असतात. सामान्य लोकांनाच नव्हे, तर काही तज्ज्ञांनाही असे वाटत होते की, कीटकांना वेदना होत नाहीत. लंडनच्या क्वीन्स मेरी युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या तीन संशोधकांनी सुमारे 300 वैज्ञानिक अभ्यासांचे सर्वेक्षण केले. त्याला असे आढळले की, किमान काही कीटकांना वेदना जाणवते. या संशोधकांनी स्वत: मधमाशीवर अभ्यास केला. जेव्हा मधमाशीला दुखावण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तिची प्रतिक्रियाही माणसांसारखीच होती.

कीटकांवर कीटकनाशके (insects) टाकल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, पक्षाघाताचा झटका येतो आणि अंतर्गत अवयव खराब होऊन त्यांचा मृत्यू होतो. कीटकनाशके कीटकांच्या मज्जासंस्थेमध्ये सोडियम वाहिन्या उघडतात. यामुळे त्यांना तीव्र वेदना होतात आणि त्यांचा मृत्यू होतो. वास्तविक, एखाद्या व्यक्तीला वेदना जाणवते; कारण मानवी शरीराची मज्जासंस्था खूप विकसित आहे. मानवी चेतापेशींमध्ये वेदना जाणवणारे रिसेप्टर्स असतात. ते वेदनांचे सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचवतात.

शास्त्रज्ञांचे असे मानणे होते की, कीटकांची मज्जासंस्था इतकी विकसित नाही की त्यांना वेदना जाणवू शकतात. (insects) या अभ्यासानुसार, इतर प्राण्यांप्रमाणेच धोक्याची जाणीव झाल्यानंतर कीटकांच्या मेंदूमध्येही रिफ्लेक्स अ‍ॅक्शन होते. याला 'नोसिसेप्शन' म्हणतात. याचा अर्थ कृमीचा मेंदू तिला वेदनांबाबत इशारा देण्यासाठी रिफ्लेक्स सिग्नल पाठवतो. तथापि, कीटकांच्या बाबतीत, वेदना आणि रिफ्लेक्स म्हणजेच 'नोसिसेप्शन' एकाचवेळी होणे गरजेचे नाही. काही वेळा एक अलर्ट सिग्नल म्हणूनही कीटकांच्या मेंदूत 'नोसिसेप्शन'वर प्रक्रिया होते. हे मात्र नक्कीच आहे की, कीटक वेदनांचे सिग्नल ओळखतात आणि वेदना टाळण्यासाठी रिफ्लेक्स क्रिया करतात. वेदनांना कीटकांचा प्रतिसाद समजून घेण्यासाठी, मज्जासंस्था विकास आणि रिफ्लेक्सच्या आधारे 8 गुणांचा अभ्यास केला गेला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT