विश्वसंचार

कियारा झाली ट्रोल!

backup backup

सध्या वरुण धवन आणि कियारा अडवाणी त्यांच्या 'जुग जुग जियो' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. मात्र, त्यापूर्वी या चित्रपटाची संपूर्ण टीम जोरदार प्रमोशन करीत आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनचाच एक भाग म्हणून वरुण-कियाराने चक्‍क मुंबई मेट्रोमधून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी वडापाव खाल्‍ला. यामुळेच हे दोघेही आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. वरुण-कियाराचा मेट्रो प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वरुण-कियारा वडापाव खाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच ट्रोलर्सनी मात्र या दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही जणांनी वरुण-कियाराला चांगलच सुनावलं आहे.

SCROLL FOR NEXT