नवी दिल्ली : आपल्या अवतीभोवतीच्या स्थितीसारखा रंग धारण करणारा सरडा म्हणजे निसर्गातील एक अनोखा जीव आहे. त्यामध्येही शॅमेलिऑन सरड्यांचे वैशिष्ट अधिकच ठळक आहे. आता अशाच एका सरड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका छोट्या व विविध रंग असलेल्या काठीवरून जात असताना हा सरडा पायाखाली असलेला रंग धारण करीत जातो.
व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता सरडा एका व्यक्तीने हातात धरलेल्या काठीवरून चढताना दिसतो. जसा जसा तो वर जातो तसे आपण पाहू शकतो काठीचा रंग वेगळा वेगळा दिसतोय; पण खरी गंमत पुढेच आहे. जसाजसा काठीचा रंग आपल्याला दिसतोय अगदी तशाच रंगात हा सरडा स्वतःला बदलताना दिसतो. त्याचा रंग बदलण्याचा वेग पाहून सगळेच थक्क होतात. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो वेळा पाहण्यात आला आहे.
अनेकांनी यावर लाईक आणि कॉमेंटस् केल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी कॉमेंटस्सुद्धा केल्या आहेत. हा व्हिडीओ 16 नोव्हेंबर रोजी शेअर करण्यात आला होता आणि आतापर्यंत जवळपास 70 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. यानंतर 3 लाख लोकांनी व्हिडीओला आपली पसंती दर्शवली आहे. जवळपास 45 हजार वेळा तो रिट्विट करण्यात आला आहे.