विश्वसंचार

ऑस्ट्रेलियात सापडला केसाळ खेकडा

Shambhuraj Pachindre

मेलबोर्न : रंग बदलणार्‍या सरड्याबद्दल तुम्ही ऐकले असेल. मात्र, पृथ्वीतलावर असा एक जीव आहे की, तो चक्‍क आपला वेश बदलून शत्रूला चकवा देतो; पण आश्‍चर्य वाटेल, हा जीव एक खेकडा आहे. पश्‍चिम ऑस्ट्रेलियात आढळणार्‍या खेकड्याच्या या प्रजातीचे नाव 'लॅमार्कड्रोमिया बिगल' असे आहे.

वेश बदलणार्‍या या खेकड्याला मॉडर्न सायन्सचे जनक चार्ल्स डार्विन यांचे जहाज 'एचएमएस बिगल'चे नाव देण्यात आले आहे. पश्‍चिम ऑस्ट्रेलियात या खेकड्याचे एक अख्खे कुटुंबच आढळले. त्यानंतर त्यांना अभ्यासासाठी म्युझीयमला पाठविण्यात आले. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया म्युझीयमचे संशोधक डॉ. अँड्र्यू होजी यांच्या मते, लॅमार्कड्रोमिया बिगल नामक खेकड्याची ही प्रजात म्हणजे स्पंज क्रेब्स फॅमिलीचे सदस्यच आहे. या प्रजातीच्या खेकड्यांवर सुमारे दोन इंच लांब केस (फर) असू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT