विश्वसंचार

उत्तम आरोग्यासाठी आश्चर्याचे भावही गरजेचे!

Arun Patil

न्यूयॉर्क : हे शीर्षक वाचून अनेकांना आश्चर्य वाटले असेल; पण ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलेच आहे! अर्थात हे संशोधकांचे म्हणणे आहे. बर्‍याच प्रसंगी आपण आश्चर्यचकीत होत असतो. आश्चर्याची ही भावना तणाव कमी करण्यास मदत करते व अनेक गंभीर आजारांपासून आपल्याला वाचवते असे त्यांचे म्हणणे आहे.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील ग्रेटर गुड सायन्स सेंटरमध्ये झालेल्या एका पाहणीमधून ही बाब समोर आली आहे. या शोधाचे प्रमुख संशोधक डॅकर केल्टनर यांनी 26 देशांच्या तीन लाख लोकांची याबाबत पाहणी केली. त्यामध्ये त्यांना आढळले की सतत आश्चर्यचकीत राहिल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. करुणा आणि उदारता यामध्येही वाढ होते व मेंदू तीक्ष्ण बनतो. 2018 मध्ये जॉन टेम्पलटन फाऊंडेशनच्या संशोधनातून समोर आले होते की आश्चर्याचा अनुभव कर्करोग, हृदयविकार आणि मधुमेहाच्या लक्षणांना धीमे करतो. तसेच तणाव आणि चिंताही घटवतो.

2021 च्या एका शोधात आढळले की आश्चर्याचा अनुभव केल्याने लोकांना स्वतःविषयी जाणून घेण्यास अधिक मदत मिळते. यामुळे धैर्यही वाढते. संशोधनानुसार एक सामान्य व्यक्ती आठवड्यातून दोन वेळा आश्चर्यचकीत होत असतो. लोक आपल्या तुलनेत इतरांच्या यशानेही चकीत होत असतात! 2018 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेत आढळले की जीवनात अधिक आश्चर्य अनुभव करणारे लोक अधिक नम्र असतात.

SCROLL FOR NEXT