पृथ्वीच्या आकर्षण शक्तीविषयी प्राचीन भारतीय विद्वानांना माहिती होती. आधुनिक विज्ञानात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आयझॅक न्यूटनने. झाडावरून खाली पडणार्या सफरचंदाकडे पाहून त्याला याबाबतचा विचार करण्यास प्रेरणा मिळाली. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती प्रत्येक गोष्ट स्वतःकडे खेचून घेत असते. मात्र, जगातील काही ठिकाणे अशीही आहेत जिथे आपल्याला ही गुरुत्वाकर्षण शक्ती तिथे काम करीत नाही की काय, असे वाटावे! अशाच काही ठिकाणांची ही माहिती…
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात हा 'मिस्ट्री स्पॉट' आहे. त्याचा शोध 1939 मध्ये लागला. त्यानंतर 1940 मध्येच हे ठिकाण लोकांसाठी खुले करण्यात आले. याठिकाणी बांधलेल्या घरात लोक टेबलवरून उभ्या स्थितीत पुढे वाकतात; पण खाली कोसळत नाहीत!
कल्पना करा एखाद्या धबधब्याचे पाणी खाली कोसळण्याऐवजी वरच उसळत आहे. फेरो आयलंडवर असे द़ृश्य पाहायला मिळते. अर्थातच ही वेगवान वार्याची करामत आहे.
अमेरिकेतील नेवाडामध्ये हे मोठे धरण आहे. जर तिथे आपण बाटलीभर पाणी वरून खाली सोडले तर ते खाली न जाता वरच्या दिशेनेच येते. त्याचे कारण धरणाची विशिष्ट रचना आणि त्यामुळे बनलेला शक्तिशाली 'अपड्राफ्ट' आहे. जोरदार वार्यामुळे पाणी वर उसळते.
लेबनानच्या या शहराला 'सिटी ऑफ फॉल्स' असे म्हटले जाते. हे शहर 131 फूट उंचीच्या पर्वताच्या कड्यावर जणू काही संतुलन साधत व गुरुत्वाकर्षण शक्तीला वाकुल्या दाखवत उभे आहे.
भूतानमधील हा प्राचीन बौद्ध मठही एका चिंचोळ्या कड्यावर उभा आहे. सन 1692 मध्ये हा मठ बांधला गेला. जणू काही तो हवेत टांगलेलाच आहे असे पाहणार्याला वाटते.
स्पेनमधील क्युंका या शहरातही पर्वतकड्यावर घरे उभी आहेत. जणू काही लटकल्यासारखी ही घरे दिसतात. हे 'हँगिंग हाऊस'चे द़ृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. जागतिक वारशांच्या यादीतही हे ठिकाण आहे.