विश्वसंचार

आता वीस मिनिटांत समजणार मेंदूची क्षमता!

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली : आपल्याकडे पाहुणे घरात आले की लहान मुलांना 'तू मोठेपणी कोण होणार?' असे हटकून विचारत असतात. ही लहान मुलं आधी मोठी तर होऊ द्या, असे पालकांच्या मनात येत असते! मात्र मुलं मोठी झाल्यावर हा प्रश्न खरोखरच पुढे उभा राहतो. अर्थातच आपले अपत्य कोणत्या क्षेत्रात करिअर करणार हे त्याच्या बौद्धिक कुवतीवरच अवलंबून असते याची पालकांनाही कल्पना असतेच. आता त्यासाठी एक मशिनही तयार करण्यात आले आहे. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या या ब—ेन मॅपिंग विशेष सॉफ्टवेअर मशिनद्वारे केवळ वीस मिनिटांतच एखाद्या व्यक्तीच्या मेंदूची क्षमता समजू शकते.

आपल्या अपत्याची शिकण्याची किती क्षमता आहे हे जाणून घेण्यास यामुळे भविष्यात मदत मिळू शकेल असे संशोधकांना वाटते. याबाबत 2017 पासून संशोधन सुरू होते. या सॉफ्टवेअरमुळे मुलांची क्षमता तपासण्यास मदत होईल. मध्य प्रदेशातील सात हजार लोकांवर या तंत्राचा वापर करण्यात आला. त्यामध्ये कर्करोग, पक्षाघात, बायपोलर डिसऑर्डर अशा गंभीर समस्या असलेल्या लोकांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्या समस्या सुटण्यास मदत झाली आहे. मेंदूच्या लहरींचे विश्लेषण हे एक नवे तंत्रज्ञान आहे. ते मेंदूचे वाचन आणि मानसिक विकार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. हे तंत्रज्ञान पाच वर्षांच्या मुलापासून ते 90 वर्षांच्या वृद्धापर्यंत काम करते. लहरींची माहिती अशी : अल्फा लहरी : मेंदूवरील नियंत्रण, विचारांमधील संतुलन किती आहे हे सांगते. बीटा लहरी : शिकण्याची, समजून घेण्याची क्षमता, स्मरणशक्तीबाबत सांगते. गामा लहरी : राग, मूड बदलणे, अस्वस्थता यासारखे विकार यामधून आढळतात. थीटा लहरी : विचार प्रक्रिया करते, भावना स्पष्ट करते. डेल्टा लहरी, झोपेची गुणवत्ता, समाधान याबाबत सांगते.

SCROLL FOR NEXT