विश्वसंचार

अमेरिकेत उडणार ‘सुपर सॉनिक’ प्रवासी विमान

Arun Patil

न्यूयॉर्क : 'अमेरिकन एअरलाईन्स' लवकरच 20 'बूम सुपरसॉनिक ओवरटर' प्रवासी जेट विमान खरेदी करणार. हे सर्वसामान्य प्रवासी विमानापेक्षा दुप्पट वेगाने उड्डाण करणारे विमान आहे. या विमानाने दिल्ली ते चेन्‍नई या प्रवासाला अवघा तास अथवा त्यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो.

अमेरिकन एअरलाईन्सने सुपरसॉनिक विमाने खरेदी करण्यास नॉन रिफंडेबल निधी कंपनीला जमा केला आहे. डेन्वरस्थित एअरोस्पेस कंपनी 'बूम' ही अशी विमाने तयार करत आहे. या विमानाचा वेग मॅक 1.7 अथवा ताशी 1975 किमी इतका प्रचंड आहे.

उल्लेखनीय म्हणजे बूम सुपरसॉनिक ओवरटर या विमानात एकदा इंधन भरले की, ते तब्बल 7870 कमी अंतर कापू शकते. यामधून 65 ते 80 प्रवासी आरामात प्रवास करू शकतात. दरम्यान, अमेरिकन एअरलाईन्सची भविष्यात अशी 40 विमाने खरेदी करण्याची योजना आहे. बूम सुपरसॉनिक जेट विमाने तयार करण्यार्‍या कंपनीच्या मतेे, या विमानाचे विशेष म्हणजे त्यांचे अत्यंत आकर्षक डिझाईन. ही विमाने समोरून टोकदार आणि मागे रूंद आहेत. यामुळे इंधनाची बचत होण्यास मदत मिळणार आहे.

विमानाच्या पंखाखाली चार इंजिन बसविण्यात आली असून ती विमानाला नियंत्रित करण्याचे काम करतात. दरम्यान, अमेरिकेत सध्या कार्यरत असलेल्या फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडून कोणत्याही विमानाला ताशी 1225 किमी पेक्षा जास्त वेगाने उड्डाण करण्यास परवानगी देण्यात येत नाही. या तुलनेत सुपरसॉनिकचा वेग जास्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT