विश्वसंचार

अन्य ग्रहांच्या तुलनेत शुक्र फिरतो उलट्या दिशेने

Arun Patil

वॉशिंग्टन : जगभरातील खगोलशास्त्रज्ञ मंगळ ग्रहानंतर शुक्राचा सखोल अभ्यास करण्यास उत्सुक असतात. ज्यावेळी ग्रहांचा विषय येतो, त्यावेळी तेथे जीवनाची शक्यता आहे का? तसेच अन्य मुद्द्यांचा विचार करण्यास प्राधान्य दिले जाते. अन्य ग्रहांच्या तुलनेत 'शुक्र' ग्रहाचे एक विशेष आहे आणि ते म्हणजे, हा खगोलीय पिंड इतर ग्रहांच्या तुलनेत चक्क उलट्या दिशेने फिरत असतो.

आपल्या सूर्यमालेतील आठपैकी सहा ग्रह पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने फिरतात, तर युरेनसचा आस इतका कलला आहे की, त्यामुळे हा ग्रह वरून खाली अशा दिशेने फिरत असतो. यामुळेच तेथे 24 तासांचा दिवस आणि 24 तासांची रात्र असते. तर आपल्या सूर्यमालेतील 'शुक्र' हा असा एकमात्र ग्रह आहे की, तो पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने फिरतो; पण असे का होते, याबाबतचे खगोलशास्त्रज्ञांचे संशोधन अद्याप सुरू आहे.

यापूर्वीच्या काही मतानुसार सुरुवातीला शुक्रही अन्य ग्रहांप्रमाणे पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने फिरत होता. मात्र, युरेनसप्रमाणचे शुक्रावरही एखादा मोठा लघुग्रह आदळला असणार. अथवा अनेक लघुग्रहांनी शुक्राला धडक दिली असणार आणि यामुळे हा ग्रह उलट्या दिशेने फिरू लागला असणार. तसेच शुक्राची अंतर्गत रचना व तेथील वातावरणामुळे फिरण्याची दिशा बदलली असणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. मात्र, अद्याप ठोस कारण स्पष्ट झालेले नाही. खगोलशास्त्रज्ञ याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करताहेत.

SCROLL FOR NEXT