विश्वसंचार

अनोखी रंगसंगती असलेल्या जेलीफिशचा शोध

Arun Patil

पोर्ट मोर्सबी : पापुआ न्यू गिनीच्या समुद्र तटाजवळ एका स्कूबा डायव्हरने अनोख्या जेलीफिशला पाहिले व तिची छायाचित्रे टिपली. ही एक नवीच प्रजाती असावी असे म्हटले जात आहे. मात्र, सुरुवातीला असे म्हटले जात होते की अशा जेलीफिशला 1997 मध्ये सर्वप्रथम पाहण्यात आले होते.

पापुआ न्यू गिनीच्या न्यू आयर्लंड प्रांतातील काविएंगमध्ये स्कूबा व्हेंचर्सचे मालक डोरियन बोरचर्डस् हे नव्या जलचरांचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरले होते. त्यांनी सोशल मीडियात म्हटले की आज स्कूबा डायव्हिंग करीत असताना पाण्यात एक नव्या प्रकारच्या जेलीफिशला पाहिले. तिच्यावर अतिशय सुंदर व वेगळी रंगसंगती होती. फुटबॉलपेक्षा थोड्या मोठ्या आकाराची ही जेलीफिश अतिशय वेगाने पोहत होती. डोरियन हे या भागात गेल्या वीस वर्षांपेक्षाही अधिक काळापासून स्कूबा डायव्हिंग करीत आहेत. मात्र, अशी जेलीफिश त्यांनीही प्रथमच पाहिली. त्यांनी व त्यांच्या कन्येने या जेलीफिशचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियात शेअर केला.

SCROLL FOR NEXT