विश्वसंचार

अनेक तास बसून राहिल्याने वाढतो हृदयाघाताचा धोका

दिनेश चोरगे

न्यूयॉर्क :  सतत बसून राहणे हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते. शारीरिक हालचाल करणे, चालणे-फिरणे हे गरजेचे आहे. आता बैठी काम किती हानिकारक ठरू शकते याबाबत 21 देशांमधील एक लाख लोकांवर पाहणीच करण्यात आली आहे. दिवसभरात सहा ते आठ तास बसून राहिल्यास हृदयाघाताचा धोका वाढतो असे यामधून दिसून आले. अकाली मृत्यूचे प्रमाणही 13 टक्क्यांनी वाढू शकते.
जगभरातील विकसनशील तसेच गरीब देशांमध्ये नोकरीच्या निमित्ताने लोक दिवसभर एकाच स्थितीत बसून काम करतात. त्यामुळे भारत, झिम्बाब्वे, बांगलादेशासारख्या अनेक देशांमध्ये सध्या अकाली मृत्यू, हृदयविकाराचे बळी वाढत आहेत. धुम्रपानामूळे  होणार्‍या मृत्यूसंख्येपेक्षा ही संख्या थोडी कमी आहे.

अमेरिकेत प्रत्येक पाचपैकी चारजणांचे नोकरीचे स्वरूप शारीरिक कष्टाचे नसते. 1950 ते 2019 पर्यंत अशा बैठ्या कामाचे किंवा तशा नोकर्‍यांचे प्रमाण 80 टक्क्यांनी वाढले आहे. सायमन फ्रेजर विद्यापीठातील संशोधक स्कॉट लियर यांनी सांगितले, अर्धा तास व्यायाम केला तरी ही जोखिम दोन टक्क्यांनी कमी होते.

विकसित देशांमध्ये दिवसभरात दहा ते आठ तास बैठे काम करतात. त्यामुळे त्यांना जोखिम दहा टक्क्यांनी वाढते. विकसनशील देशांत ही जोखिम 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. दिवसभरात किमान तासभर तरी व्यायाम केला पाहिजे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT