विश्वसंचार

अजरबैझानात मातीच्या ज्वालामुखीचा उद्रेक

अमृता चौगुले

बाकू : अजरबैझान या देशामधील बाकू प्रांतातील गारादाघ जिल्ह्यामध्ये अवघ्या दोन दिवसांपूर्वी मातीच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड वेगाने हवेत चिखल उडत होता. सध्या या ज्वालामुखीचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

तसे पाहिल्यास मातीचे ज्वालामुखी जगात बहुतेक देशांमध्ये पहावयास मिळतात. यातील काही अंदमान व निकोबारमध्येही आढळून येतात. मातीच्या ज्वालामुखीला मड डोम असेही म्हटले जाते. यामधून मोठ्या प्रमाणात गरम माती अथवा चिखल बाहेर पडतो. खरे तर या ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडत नाही. मात्र, त्यांचा व्यवहार खर्‍याखुर्‍या ज्वालामुखीसारखाच असतो. काहीवेळा असे ज्वालामुखी सर्वसामान्यपणे एक ते दोन मीटर उंच असतात. पण काहीवेळा त्यांची उंची 700 मीटरपर्यंत असते आणि चिखल 10 किमी परिसरात पसरतो. यामधून माती आणि गरम पाणी असे मिश्रण असलेला चिखल बाहेर पडतो.

मातीच्या ज्वालामुखीचे तापमान 2 ते 100 अंश सेल्सिअस इतके असू शकते. लोक या ज्वालामुखीय चिखलात स्नानही करतात. मातीच्या ज्वालामुखीतून 86 टक्के मिथेन आणि काही प्रमाणात कार्बनडायऑक्साइड व नायट्रोजन बाहेर पडतो. असे ज्वालामुखी जगातील बहुतेक देशांत आढळतात. यामध्ये युरोप, आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा समावेश आहे. या सर्व देशांतील मातीचे ज्वालामुखी वेगवेगळ्या आकाराचे आहेत. अजरबैझानमध्ये तर सुमारे 400 हून अधिक मातीचे ज्वालामुखी आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT