विश्वसंचार

अंतराळातील ‘या’ घटनांनी गाजवले यंदाचे वर्ष

Arun Patil

वॉशिंग्टन : यंदाचे वर्ष अंतराळ अभ्यासासाठी विशेष ठरले. अंतराळ शास्त्रज्ञांनी व्यावसायिक उद्योग आणि परदेशी राष्ट्रांच्या सहकार्याने यावर्षी अनेक अविश्वसनीय गोष्टी साध्य केल्या.

आकाशगंगेतील सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलचे चित्र टिपण्यात 'नासा'च्या शास्त्रज्ञांना यश आलेे. या ब्लॅकहोलची खासियत म्हणजे, आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर कोणत्याही वस्तूला आपल्याकडे खेचून घेण्याची क्षमता या ब्लॅक होलमध्ये आहे. इव्हेन्ट होरायझन टेलिस्कोप या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने हे चित्र प्रदर्शित करण्यात आले आहे. याच आंतरराष्ट्रीय संस्थेकडून 2019 साली पहिल्यांदाच दुसर्‍या एका आकाशगंगेतील ब्लॅक होलचे चित्र प्रदर्शित करण्यात आले होते, हे विशेष.

अंतराळातील सर्वात शक्तिशाली वेधशाळेने म्हणजे 'नासा'ने जानेवारीच्या उत्तरार्धात पृथ्वीपासून 1 दशलक्ष मैल दूर असलेल्या स्थानकाचा वेध घेतला आणि त्या ठिकाणचा क्लिष्ट, टेनिस कोर्ट-आकाराच्या सन शिल्डचे छायाचित्र घेतले. खगोल शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, या दुर्बिणीमुळे ब्रह्मांडाबद्दलच्या आपल्या माहितीमध्ये महत्त्वाची भर पडेल. तसेच त्यामुळे कोट्यवधी प्रकाश वर्ष दूर अंतराळाचे छायाचित्र मिळेल.

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीइतके उंच रॉकेटचे मार्चमध्ये लाँचिंग करण्यात आले. अमेरिकेतील फ्लोरिडा लाँचपॅडवरून त्याची महत्त्वपूर्ण चाचणी केली. 'नासा'चा विश्वास होता की, पहिले लाँचिंग मे महिन्याच्या सुरुवातीला होऊ शकते. तथापि, चाचणीदरम्यान अनेक समस्या उद्भवल्यामुळे या लाँचिंगला विलंब झाला. हे रॉकेट आतापर्यंत बांधलेले सर्वात महागडे मानले जाते. प्रत्येक प्रक्षेपणाची किंमत 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ही किंमत 'नासा'च्या बजेटच्या सुमारे एक पंचमांश इतकी आहे.

शनीचा चंद्र 'मीमास'वर मानवी जीवनाला आधार देऊ शकेल असा पुरावा खगोल शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे. प्लॅनेटरी सायन्स जर्नल इकारसमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनात शास्त्रज्ञांना अनपेक्षितपणे चंद्राच्या बर्फाळ कवचाखाली महासागराची चिन्हे कशी सापडली, याचे वर्णन करण्यात आले आहे.

हबल स्पेस टेलिस्कोपने नुकताच शोधलेला धूमकेतू आतापर्यंतचा सर्वात मोठा स्पेस स्नोबॉल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. बर्फ, धूळ आणि खडकाचा हा तेजस्वी गोळा आकाराने प्रचंड असल्याचे निदर्शनाला आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT