विश्वसंचार

अंतराळात होणार ‘सोन्याचा वर्षाव’!

Shambhuraj Pachindre

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी आता एका दुर्मीळ तारा प्रणालीचा शोध लावला आहे, जी एका शक्तिशाली स्फोटाला 'ट्रिगर' करू शकते. यामधून भविष्यात 'किलोनोव्हा' बनण्याची शक्यता आहे. अशा स्फोटांमध्ये सोने, चांदीसारख्या मौल्यवान धातूंची निर्मिती होत असते. दहा अब्ज प्रणालींमध्ये एखादीच अशी असते.

ज्यावेळी दोन न्यूट्रॉन तार्‍यांचा एकमेकांमध्ये विलय झालेला संशोधकांनी पाहिला त्यावेळी या प्रणालीचा शोध लागला. या तारा समूहाला 'सीपीडी-29 2176' असे नाव देण्यात आले आहे. ही प्रणाली पृथ्वीपासून सुमारे 11,400 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. 'नासा'च्या नील गेहरल्स स्विफ्ट ऑब्झर्व्हेटरीने या प्रणालीला पाहिले. दोन्ही न्यूट्रॉन तार्‍यांचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या सुमारे 2.7 पट आहे. हे दोन तारे एकमेकांशी धडकण्यापूर्वी अब्जावधी वर्षे एकमेकांची प्रदक्षिणा करीत होते. चिलीमधील 1.5 मीटरच्या टेलिस्कोपने या स्फोटाचे निरीक्षण करण्यात आले. त्यामधून असे स्पष्ट झाले की या स्फोटामधून एक 'किलोनोवा' बनू शकतो. ज्यावेळी दोन न्यूट्रॉन तार्‍यांची एकमेकांना धडक होऊन एक मोठा स्फोट होतो त्यावेळी त्याला 'किलोनोवा' असे म्हटले जाते. त्यामधून उच्च ऊर्जा असलेले कण वेगाने उत्सर्जित होतात. याठिकाणी इतकी उष्णता निर्माण होते की त्यापासून एक रेडियोअ‍ॅक्टिव्ह चमकदार प्रकाशही निर्माण होतो. तो मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि युरेनियमसारख्या धातूंची निर्मिती करतो.

SCROLL FOR NEXT