विश्वसंचार

अंगावर कॉफी सांडल्याने द्यावी लागली मोठी भरपाई

दिनेश चोरगे

वॉशिंग्टन : अमेरिकेत एका वृद्ध महिलेच्या अंगावर गरम कॉफी सांडल्यानंतर आता संबंधित रेस्टॉरंटला कोट्यवधी रुपयांची भरपाई द्यावी लागली आहे. 2021 मध्ये जॉर्जियामधील एका महिलेला कॉफी देत असताना कर्मचार्‍याच्या हातून कप निसटला आणि गरम कॉफी या महिलेच्या पायावर पडली. त्यामुळे या 70 वर्षांच्या महिलेची त्वचा भाजली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते.

या महिलेच्या पायावर कॉफी सांडल्याने तिला गंभीर दुखापत झाली असे न्यायालयात सांगण्यात आले. या दुखापतीनंतर तिला पुन्हा चालणे शिकावे लागले. अजूनही तिला दैनंदिन कामे करण्यात अडचणी येत आहेत. या महिलेला झालेल्या भाजल्याच्या जखमा इतक्या खोल होत्या की त्यांना अनेक आठवडे रुग्णालयातील बर्न यूनिटमध्ये राहावे लागले. आताही त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे. त्यांना अजूनही चालत असताना त्रास होतो. या जखमांच्या उपचारांसाठी त्यांना तब्बल 2 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.66 कोटी रुपये खर्च आला. जर कॉफीच्या कपाचे झाकण नीट लावले असते तर अशी दुर्घटना घडली नसती. मात्र, हे झाकण उघडे होते. याप्रकरणी महिलेला भरपाई म्हणून 30 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 24.95 कोटी रुपये द्यावे लागले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT