विश्वसंचार

अँटिबायोटिक्सचा अतिवापर ‘या’ कारणासाठीही हानिकारक

Arun Patil

न्यूयॉर्क : जगभरात अँटिबायोटिक्सचा वापर बेसुमार वाढला आहे. त्यामुळे अशा औषधांनाही न जुमानणारे 'सुपरबग' विकसित होत आहेत. अँटिबायोटिक्स सतत वापरल्याने अनेक प्रकारची हानी होत असते. तज्ज्ञांनी म्हटले आहे की अँटिबायोटिक्सचा अतिवापराने बहिरेपण देखील येऊ शकते. अँटिबायोटिक्सच्या अतिवापरामुळे कानातील पेशी मरतात ज्यामुळे व्यक्ती बहिरी होऊ शकते. अँटिबायोटिक्सच्या अतिवापराने ऐकण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होऊ शकते.

इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी नोंदवले आहे की अँटिबायोटिक्सच्या वापरामुळे श्रवणासाठी जबाबदार असलेल्या पेशींमध्ये ऑटोफॅजी यंत्रणा सुरू होते, ज्यामुळे ऐकण्याच्या पेशी पूर्णपणे मरतात. अनेकदा लोक किरकोळ समस्यांवर अँटिबायोटिक्सनी उपचार करतात. कोरोनाच्या काळात देखील लोकांनी काही अँटिबायोटिक्सचा जास्त वापर केला आहे. अँटिबायोटिक्सचे अतिसेवन इतर अनेक आजारांना बळी पाडू शकते.

अँटिबायोटिक्सच्या अतिवापरामुळे अँटिबायोटिक्स रेसिस्टेन्सची क्षमता उद्भवू शकते, ज्यामुळे शरीरात असलेल्या जीवाणूंवर औषधांचा प्रभाव पडत नाही. सर्दी किंवा काही किरकोळ समस्या असताना अँटिबायोटिक्स घेण्याची सवय बदलणे हितावह ठरते. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत.

SCROLL FOR NEXT