मार्क झुकेरबर्ग Pudhari File Photo
विश्वसंचार

झुकेरबर्गच्या 7.5 कोटी रुपयांच्या घड्याळाची चर्चा

Mark Zuckerberg | ग्रीबेल फोर्सी ‘हँड मेड 1’ या कंपनीचे घड्याळ

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्यांपैकी जामनगर येथील सोहळ्यात मेटाचा मालक मार्क झुकेरबर्ग व त्याची पत्नी प्रिसिला चॅन हे सहभागी झाले होते. त्यावेळी अनंतच्या मनगटावरील महागडे घड्याळ हे दाम्पत्य कुतूहलाने पाहत त्याबाबत चौकशी करीत होते. आता खुद्द झुकेरबर्गच्याच घड्याळाची चर्चा सर्वत्र होत आहे. त्याच्या या घड्याळाची किंमत आहे 7.5 कोटी रुपये (फक्त!)

फेसबुकचा सहसंस्थापक असलेल्या झुकेरबर्गने नुकतीच फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या मेटा प्लॅटफॉर्ममध्ये मोठा धोरणात्मक बदल करण्याची घोषणा केली आहे. एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांनी या बदलांबाबत सांगितले. या व्हिडीओत त्यांनी सांगितले की, कंपनी यापुढे थर्ड पार्टी फॅक्ट-चेकर्ससोबत मिळून काम करणार नाही. त्यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या मनगटावर एक अतिशय महागडे घड्याळ बांधलेले दिसून आले. सध्या या घड्याळाची चर्चा सोशल मीडियात आहे. या घड्याळाची किंमत तब्बल 9 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 7.7 कोटी रुपये आहे. अनेक नेटकर्‍यांनी याबाबतच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. फेसबुकच्या कम्युनिटी नोटस् अनाऊन्समेंट व्हिडीओमध्ये झुकेरबर्गने दहा लाख डॉलर्सचे घड्याळ घातले होते असे एका व्हेंचर कॅपिटलिस्टने ट्विट केले आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार झुकेरबर्गने परिधान केलेले घड्याळ ग्रीबेल फोर्सी ‘हँड मेड 1’ या कंपनीचे होते. हे अत्यंत दुर्मीळ व महागडे घड्याळ आहे. वर्षभरात त्याचे केवळ दोन-तीन मॉडेल तयार केले जातात. यापूर्वी झुकेरबर्ग पॅटेक फिलिप व एफपी जॉर्नसारख्या लक्झरी ब्रँडची घड्याळे परिधान करून दिसले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT