YouTuber Sourav Joshi | यूट्यूबर सौरव जोशीने गरीब चिमुकल्यांना घडवली पहिली विमानसफर! 
विश्वसंचार

YouTuber Sourav Joshi | यूट्यूबर सौरव जोशीने गरीब चिमुकल्यांना घडवली पहिली विमानसफर!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील पहिल्या क्रमांकाचा डेली व्लॉगर आणि प्रसिद्ध यूट्यूबर सौरव जोशीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तो केवळ त्याच्या व्हिडीओंद्वारे लोकांचे मनोरंजनच करत नाही, तर लोकांची मन जिंकणेही त्याला तितकेच चांगले जमते. सौरवने गरीब आणि गरजू मुलांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे सरप्राईज देत पहिल्यांदा हवाई प्रवासाचा (विमानसफर) आनंद घडवून आणला आहे.

यूट्यूबवर ४ कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स असलेल्या सौरव जोशीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने गरजू मुलांसाठी एका विशेष ‘फ्लाईट एक्सपिरियन्स’चे नियोजन केले होते. जी मुले आतापर्यंत केवळ आकाशात उडणाऱ्या विमानाकडे खाली उभे राहून पाहायची किंवा कार्टूनमध्ये विमान पाहायची, त्यांच्यासाठी हा क्षण एखाद्या जादूच्या स्वप्नापेक्षा कमी नव्हता. सौरवने या मुलांना हल्द्वानी ते दिल्ली आणण्यासाठी विमानाची व्यवस्था केली होती. जेव्हा ही मुले विमानतळावर पोहोचली आणि विमानात बसली, तेव्हा त्यांच्या आनंदाला उरला उरला नव्हता. सौरव जोशी स्वतः एका अत्यंत सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातून पुढे आला आहे. त्याने आपल्या सुरुवातीच्या दिवसांत पैशांची तंगी आणि संघर्षाचा काळ खूप जवळून पाहिला आहे.

म्हणूनच एका छोट्याशा संधीमुळे किंवा अनुभवामुळे मुलाच्या आयुष्यात आणि त्याच्या विचारात किती मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, हे तो चांगल्या प्रकारे जाणतो. भारतात कोट्यवधी मुले अशी आहेत जी चांगल्या शिक्षणासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी झगडत असतात. अशा परिस्थितीत, ‘तुम्हीसुद्धा मोठी स्वप्ने पाहू शकता’ असा विश्वास या चिमुकल्यांना देण्यासाठी सौरवने हे पाऊल उचलले. हा प्रवास केवळ विमानापुरता मर्यादित नव्हता. सौरव जोशी आणि त्याची पत्नी अवंतिका स्वतः या मुलांसोबत दिवसभर दिल्लीत उपस्थित होते. त्यांनी मुलांना दिल्लीतील प्रसिद्ध ठिकाणे फिरवली, गेमिंग आर्केडमध्ये नेऊन भरपूर खेळ खेळवले आणि सर्वांनी मिळून पिझ्झा पार्टी केली. मुलांसोबत घालवलेल्या या दिवसाने अनेक अमूल्य आठवणी निर्माण केल्या. यानंतर सर्व मुलांना सुरक्षितपणे बसने परत हल्द्वानीला पाठवण्यात आले. या संपूर्ण प्रवासाचा व्हिडीओ सौरवने आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT