नवी दिल्ली : यूट्यूब लवकरच मोबाईल वापरकर्त्यांसाठी सुपर रेझोल्यूशन नावाचे एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फिचर आणत आहे. हे फिचर व्हिडीओची गुणवत्ता आपोआप सुधारण्यासाठी डिझाईन केले आहे. हे फिचर पुढे दिलेल्या माहितीनुसार काम करणार आहे.
ऑटोमॅटिक अपस्केलिंग : हे एआय सिस्टीम व्हिडीओचे कमी रिझोल्यूशन (उदा. 1080 पेक्षा कमी किंवा व्हिडीओ) आपोआप ओळखेल.
गुणवत्ता सुधारणा : एआय मॉडेल त्या व्हिडीओला एचडी (हायडेफिनिशन) किंवा फोर केपर्यंत अपस्केल करेल, ज्यामुळे व्हिडीओ अधिक स्पष्ट (शार्प) दिसेल.
दोन व्ह्यूचा पर्याय : वापरकर्त्यांना सुपर रेझोल्यूशन लेबलसह सुधारित (अपस्केल्ड) व्हिडीओ पाहण्याचा किंवा मूळ (ओरिजनल) गुणवत्तेतील व्हिडीओ पाहण्याचा पर्याय मिळेल.
क्रिएटर्सना नियंत्रण : हे फिचर स्वयंचलित असले, तरी व्हिडीओ मूळ गुणवत्तेतच दाखवायचा असल्यास क्रिएटर्सना हे फिचर ऑफ करण्याचा पर्याय मिळेल.
भागीदारी : व्हिडीओ गुणवत्तेतील सुधारणांसोबतच यूट्यूबने शॉर्टस् क्रिएटर्ससाठी सोबत भागीदारी केली आहे. आता प्रीमियर प्रो आणि इतर टूल्समध्ये थेट यूट्यूब शॉर्टस् एडिट करणे सोपे होईल. यूट्यूबचे हे पाऊल शॉर्टस् क्रिएटर्सना अधिक चांगली साधने उपलब्ध करून स्पर्धेत आपली जागा मजबूत करेल.