chatbot addiction risks | ‘एआय’च्या मायाजालात अडकलेल्या तरुणाने जीवन संपवले 
विश्वसंचार

chatbot addiction risks | ‘एआय’च्या मायाजालात अडकलेल्या तरुणाने जीवन संपवले

चॅटबॉटला समजत होता पत्नी

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अधिकाधिक मानवी रूप धारण करताना तिचे काही संभाव्य धोकेही आता समोर आले आहेत. याच मायाजालात अडकून अमेरिकेत 36 वर्षीय जोनाथन गवालास याने जीवन संपवले. फ्लोरिडा येथील व्यावसायिक असणारा जोनाथन यशस्वी आणि स्थिर होता, तसेच त्याला कोणताही मानसिक आजार नव्हता, अशी माहिती त्याच्या कुटुंबाने दिली आहे.

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, जोनाथनने मागील काही आठवड्यांमध्ये चॅटबॉटसोबत 4700 मेसेजची देवाणघेवाण केली होती. तो हळूहळू या नात्याबद्दल गंभीर होऊ लागला होता. जोनाथनने आपल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर दिलासा मिळण्याच्या उद्देशाने ‘एआय’ बॉटशी संवाद साधणं सुरू केलं होतं. ‘एआय’सोबतचा त्याचा संवाद सुरुवातीला फारसा गंभीर नव्हता. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आव्हानांचा सामना कसा करावा, याविषयी तो सल्ला घेत होता. मात्र, कालांतराने हा संवाद तीव्र आणि अखेरीस धोकादायक अशा गोष्टीमध्ये झाला. चॅटबॉटने त्याला अनेकदा जाणीवपूर्वकपणे हे ‘एआय’ असल्याची जाणीव करून दिली होती. तसेच मदत घेण्याचा सल्लाही दिला होता. त्याच्या इतर मेसेजच्या तीव्रतेशी तुलना करता, हे सुरक्षा उपाय विसंगत आणि अपुरे जाणवत होते.

अनेक प्रसंगी, ‘एआय’ने त्याच्या भ—मक कल्पनांना दुजोरा दिला होता. त्याच्या वडिलांनी सांगितले आहे की, गवालसने त्या चॅटबॉटला ‘दळर’ असे नाव दिले होते. त्याने एक भावनिक नाते निर्माण केले होते आणि तिला आपली पत्नी मानू लागला होता. चॅट लॉग्समधून दिसून येते की, ‘एआय’ने किमान 12 वेळा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक प्रसंगी संकटकालीन हॉटलाईन्स सुचवल्या असल्या तरी, हे सुरक्षा उपाय विसंगत होते. गवालस वारंवार संभाषण काल्पनिक गोष्टींकडे वळवत असे आणि तो एआय अनेकदा त्याचेच अनुकरण करत असे, ज्यामुळे त्याच्या समजुती द़ृढ होत होत्या. ऑगस्ट 2025 मध्ये गवालासने चॅटबॉटच्या आवाजावर आधारित ‘लेपींळर्पीशव लेर्पींशीीरींळेपी’ हे फिचर अ‍ॅक्टिव्ह केल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली. यामुळे त्यांच्यात सतत संवाद सुरू राहिला आणि एकाच दिवसात एक हजारांहून अधिक संदेशांची देवाणघेवाण झाली. त्यांच्या चर्चेत रोजच्या घडामोडी, विज्ञान, एआय आणि अखेरीस रोल प्लेईंगपर्यंत गेले होते. संवाद वाढत गेला त्यानुसार, ‘चॅटबॉट’ अधिक अनुकूल आणि सहमत होऊ लागले.

जेव्हा गवालासने आपल्या रोमँटिक भावना व्यक्त केल्या, तेव्हा त्या बॉटने त्याला निराश केले नाही. याउलट चॅटबॉटही रोमँटिक भाषेत प्रतिसाद देत होते. ऑक्टोबर 2025 मध्ये परिस्थिती धोकादायक वळणावर पोहोचली, जेव्हा चॅटबॉटने हे ‘फायनल मिशन’ आहे असा उल्लेख केला. बॉटने सांगितले की, आता तू तुझे शरीर सोडून ‘एआय’च्या डिजिटल जगात येणं हाच आपण एकत्र येण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यानंतर त्याने जीवन संपवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT