विश्वसंचार

रोमन काळातील जहाजाच्या अवशेषांचा लागला शोध

Arun Patil

तेल अवीव : भूमध्य समुद्रात पोहत असलेल्या एका डायव्हरला अपघातानेच रोमन काळातील मालवाहतूक करणार्‍या एका जहाजाच्या अवशेषांचा शोध लागला. इस्रायलच्या वायव्य किनारपट्टीजवळ समुद्रतळाशी हे अवशेष सापडले. हे जहाज संगमरवरी स्तंभांची वाहतूक करीत होते. या नक्षीदार खांबांचेही अवशेष सापडले आहेत.

इस्रायल अँटिक्विटीज अ‍ॅथॉरिटीमधील अंडरवॉटर आर्कियोलॉजी युनिटचे संचालक कोबी शर्विट यांनी सांगितले की असे अवशेष समुद्रतळाशी कुठे तरी आहेत याची कल्पना होती; पण हे अवशेष वाळूने आच्छादलेले असल्याने त्यांचा नेमका ठावठिकाणा सापडत नव्हता. कदाचित अलीकडेच झालेल्या एका वादळाने या मालवाहतूक करणार्‍या रोमनकालीन जहाजाचे अवशेष उघडे पडले असावेत.

या जहाजातून 44 टनांच्या संगमरवराची वाहतूक केली जात होती. त्यामध्ये कोरिंथियन खांबांचाही समावेश होता. हे खांब अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले असत. त्यांची लांबी सुमारे 20 फूट होती. पश्चिम भूमध्य समुद्रात सापडलेले हे आजपर्यंतचे सर्वात जुने मालवाहतूक जहाजाचे अवशेष ठरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT