जकार्ता : स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या शर्यतीत ‘इन्फिनिक्स’ (Infinix) ने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. कंपनीच्या Hot 60 Pro+ या नव्या स्मार्टफोनने जगातील सर्वात पातळ 3-D कर्व्हड् डिस्प्ले फोन म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. Infinix Hot 60 Pro+ च्या या विक्रमाची अधिकृत घोषणा इंडोनेशियातील ऐतिहासिक बोरबुदूर मंदिरात झालेल्या भव्य समारंभात करण्यात आली.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या मान्यतेसाठी ILAC-अधिकृत प्रयोगशाळेने या फोनचे 10 वेगवेगळ्या बिंदूंवर लेसर मोजमाप केले. त्यात फोनची जाडी सर्वात पातळ भागात केवळ 5.95 मि.मी. आणि सर्वाधिक जाडी 6.09 मि.मी. असल्याचे प्रमाणित झाले. गिनीजच्या निकषानुसार, 6.09 मि.मी. ही अधिकृत माप म्हणून स्वीकारण्यात आली, ज्यामुळे Infinix Hot 60 Pro+ ला जागतिक विक्रम मिळाला.
Hot 60 Pro+ केवळ पातळपणातच नव्हे, तर तांत्रिक वैशिष्ट्यांतही आघाडीवर आहे. 6.78-इंच 144 Hz कर्व्हड् AMOLED डिस्प्ले : 1.5 K रिझोल्यूशन आणि 4,500 निटस् ब—ाईटनेससह. MediaTek Helio G 200 प्रोसेसर : 8 GB RAM आणि 128 GB/256 GB स्टोअरेज पर्याय. 50 MP मुख्य कॅमेरा (Sony IMX882) : 2 K व्हिडीओ रेकॉर्डिंगसह 13 MP फ्रंट कॅमेरा. 5,160 mAh बॅटरी : 45 W फास्ट चार्जिंग आणि 10 W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट.
IP65 डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टन्स, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, Android 15 वरील दजड 15 सॉफ्टवेअर. ‘इन्फिनिक्स’चे सीईओ टोनी झाओ यांनी या यशाबद्दल सांगितले, ‘Hot 60 Pro+ हे केवळ डिझाईन आणि परफॉर्मन्सचे परिपूर्ण मिश्रण नाही, तर स्मार्टफोन उद्योगातील आमच्या सातत्यपूर्ण नवकल्पनांचा पुरावा आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची मान्यता आमच्या टीमच्या समर्पणाचे आणि जागतिकस्तरावर नवे मापदंड निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.’ Infinix Hot 60 Pro+ ने केवळ डिझाईनच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत, तर स्मार्टफोनच्या भविष्यासाठी एक नवा अध्याय सुरू केला आहे. या विक्रमामुळे जागतिक बाजारपेठेत ‘इन्फिनिक्स’ची ओळख नव्या उंचीवर पोहोचली आहे, तसेच तरुण वापरकर्त्यांना नावीन्यपूर्ण डिजिटल अनुभवाची प्रेरणा मिळाली आहे.