Smallest AI computer Pudhari Photo
विश्वसंचार

Smallest AI computer: जगातला सर्वात छोटा एआय सुपरकॉम्प्युटर ‌‘पॉकेट लॅब‌’

अमेरिकेतील एका नवीन कंपनीने, ‌‘टायनी एआय‌’ने, जगातील सर्वात लहान वैयक्तिक ‌‘एआय‌’ सुपरकॉम्प्युटर बनवला आहे

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका नवीन कंपनीने, ‌‘टायनी एआय‌’ने, जगातील सर्वात लहान वैयक्तिक ‌‘एआय‌’ सुपरकॉम्प्युटर बनवला आहे. याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌‍नेही मान्यता दिली आहे. या लहानग्या डिव्हाईसचे नाव टायनी एआय पॉकेट लॅब आहे. हे डिव्हाईस एका पॉवर बँकसारखे दिसते आणि खिशात सहज ठेवता येते. याची सर्वात खास गोष्ट म्हणजे, हा 120 अब्ज पॅरामीटर्स असलेल्या मोठ्या एआय मॉडेलला कोणत्याही क्लाऊड, सर्व्हर किंवा महागड्या जीपीयूशिवाय स्वतःवर चालवू शकतो.

कंपनीने हे डिव्हाईस 10 डिसेंबर रोजी लाँच केले. याच्या मदतीने सामान्य लोकसुद्धा डेटा सेंटरसारखी शक्ती आपल्या हातात मिळवू शकतात. ‌‘इंटरेस्टिंग इंजिनिअरिंग‌’च्या अहवालानुसार, टायनी एआयचे ‌‘जीटीएम‌’ डायरेक्टर समर भोज यांनी सांगितले की, क्लाऊड एआयमुळे खूप फायदा झाला असला, तरी आता पर्यावरणाची चिंता वाढली आहे. त्यांच्या मते, बुद्धिमत्ता डेटा सेंटरमध्ये नव्हे, तर लोकांकडे असायला हवी. पॉकेट लॅब याच विचारातून बनवले गेले आहे. हे डिव्हाईस इंटरनेटशिवाय काम करते आणि डेटा डिव्हाईसवरच ठेवते, ज्यामुळे बँकेसारखी मजबूत सुरक्षा मिळते. यामुळे खासगी माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते आणि विजेचा वापरही खूप कमी होतो.

पॉकेट लॅबमध्ये ARMv9.2 चा 12 कोर CPU आहे आणि तो फक्त 65 वॅट विजेवर काम करतो. हा सामान्य GPU असलेल्या सिस्टीमपेक्षा खूप कमी वीज वापरतो. यात टर्बोस्पार्स आणि पॉवरइन्फर या दोन खास तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. टर्बोस्पार्समुळे फक्त आवश्यक न्यूरॉन्स सक्रिय होतात, ज्यामुळे वेग वाढतो. पॉवरइन्फरमुळे CPU आणि NPU वर कामाची विभागणी होते, ज्यामुळे कमी विजेत चांगला परफॉरमन्स मिळतो.

छोटा सुपरकॉम्प्युटर कोणासाठी?

हा छोटा सुपरकॉम्प्युटर डेव्हलपर्स, संशोधक, क्रिएटर्स, प्रोफेशनल्स आणि विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आला आहे. हा वर्कफ्लो, कंटेंट तयार करणे आणि संवेदनशील माहितीवर सुरक्षितपणे प्रक्रिया करण्यास मदत करतो. सर्व काही ऑफलाईन चालते, त्यामुळे इंटरनेटची गरज नसते. डिव्हाईसमध्ये यूजरचा डेटा, पसंती आणि कागदपत्रे स्थानिक पातळीवर (लोकल) साठवले जातात. हा 10 अब्ज ते 100 अब्ज पॅरामीटर्स असलेले मॉडेल उत्तम प्रकारे चालवतो, जे दैनंदिन कामासाठी पुरेसे आहेत. हा 120 अब्ज पॅरामीटर्सपर्यंतचे मॉडेलही चालवू शकतो, जी ‌‘जीपीटी-4‌’सारखी बुद्धिमत्ता देते. जानेवारी 2026 मध्ये ‌‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो‌’मध्ये हा डिव्हाईस प्रदर्शित केला जाईल. हा लहान डिव्हाईस ‌‘एआय‌’ला प्रत्येकासाठी खासगी आणि वैयक्तिक बनवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT