World’s Oldest Cat | इंग्‍लंडमध्‍ये आहे जगातील सर्वांत वयोवृद्ध मांजर! 
विश्वसंचार

World’s Oldest Cat | इंग्‍लंडमध्‍ये आहे जगातील सर्वांत वयोवृद्ध मांजर!

खाण्यात ‘प्रोटीन डाएट’ अन् पिण्यासाठी फक्त ‘मिनरल वॉटर’

पुढारी वृत्तसेवा

लंडन : सामान्यतः मांजरांचे आयुष्य १२ ते १८ वर्षे असते. मात्र, इंग्लंडमधील ‘मिली’ नावाची मांजर सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरली आहे. ३१ व्या वर्षात पदार्पण केलेल्या या मांजराची गणना जगातील सर्वांत वयोवृद्ध मांजरांमध्ये केली जात आहे. नुकताच मिलीचा ३१ वा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला. मिलीच्या एवढ्या लांब आयुष्याचे आणि निरोगी आरोग्याचे रहस्य तिच्या खास डाएट आणि काळजीमध्ये दडलेले आहे, असे तिच्या मालकाने सांगितले.

मिलीचे अलिशान डाएट अन् दिनचर्या

मिलीच्या जेवणात सॅल्मन, प्रॉन्स, चिकन आणि टूना यांसारख्या उच्च प्रोटीनयुक्त मांसाहाराचा समावेश असतो. पिण्यासाठी नळाचे पाणी न देता तिला गेल्या अनेक वर्षांपासून फक्त ‘बक्स्टन मिनरल वॉटर’ दिले जाते. भरपूर झोप, वेळेवर आरोग्य तपासणी आणि तणावमुक्त वातावरणामुळे ती ३१ व्या वर्षीही अत्यंत चपळ आहे.

रेकॉर्डच्या शर्यतीत मिली

कागदपत्रांच्या अभावामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌मध्ये तिची अधिकृत नोंद झालेली नसली, तरी मांजरांच्या जगात ३१ वर्षे जगणे ही अत्यंत दुर्मीळ घटना मानली जाते. गिनीजनुसार सध्या जिवंत असलेल्या सर्वांत जुन्या मांजराचा विक्रम ‘फ्लॉसी’च्या नावावर आहे, तर इतिहासातील सर्वांत जास्त (३८ वर्षे) जगलेली मांजर ‘क्रीम पफ’ होती. प्राणिप्रेमी मिलीच्या या कहाणीने प्रभावित झाले असून, आपल्या पाळीव प्राण्यांच्या डाएटची काळजी घेण्याची प्रेरणा यातून घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT