वॉशिंग्टन ः जगातील अनेक देशांनी आपल्याकडील सोनं सुरक्षित तिजोरीमध्ये ठेवलेलं आहे. अनेक देशांकडे सोन्याचे प्रचंड साठे आहेत. अमेरिकेकडे सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. अमेरिकेतील एका इमारतीत तर 4,60,00,000 टन सोनं ठेवण्यात आले आहे. ही जगातील अतिसुरक्षित इमारत आहे. अणुबॉम्ब टाकला, भूकंप आला तरी ‘या’ इमारतीला धक्का लागणार नाही, असे सांगितले जाते.
जगभरात पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांचे भवन या सर्वात सुरक्षित इमारत मानल्या जातात. या इमारतींची सुरक्षा व्यवस्था सर्वात कडक आणि मजबूत असते. मात्र, अमेरिकेत एक अशी इमारत आहे जी जगातील सर्वात सुरक्षित इमारतींपैकी एक आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपती भवन पेक्षा जास्त "VVIP' सुरक्षा या इमारतीला आहे. या इमारतीची सुरक्षा इतकी कडक आहे की राष्ट्राध्यक्षही येथे सहज प्रवेश करू शकत नाहीत. या इमारतीत पक्षीही घुसू शकत नाही. अमेरिकेतील ‘फोर्ट नॉक्स’ ही जगातील सर्वात सुरक्षित इमारत आहे. अमेरिकेच्या केंटकी राज्यात ‘नॉक्स’ ही इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत सोन्याचा साठा ठेण्यात आलेला आहे. अमेरिकेतील 46 लाख किलो सोने फोर्ट नॉक्समध्ये ठेवण्यात आले आहे.
याशिवाय, अमेरिकन स्वातंत्र्याची मूळ घोषणा, गुटेनबर्गचे बायबल आणि अमेरिकन संविधानाची मूळ प्रत यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी येथे ठेवल्या आहेत. संपूर्ण अमेरिकेतील अर्धे सोने या इमारतीत ठेवण्यात आले आहे. या इमारतीच्या जमिनीखाली स्फोटके लावण्यात आली आहेत. भूकंप, पूर, त्सुनामी अशा सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींपासून ही इमारत सुरक्षित आहे. येथील सुरक्षा व्यवस्था इतकी कडक आहे की कोणी इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केलेला नाही. लॉकरचे रक्षण करणारे मिंट पोलिस अधिकारी हे अमेरिकन सरकारचे सर्वात विश्वासू लोक आहेत. यांना चोख सुरक्षा देण्याची शपथ दिली जाते. येथे सुरक्षेसाठी रडार, हेलिकॉप्टर, सीसीटीव्ही कॅमेरे यांचे जाळे बसवले आहे. 30 हजारांहून अधिक सशस्त्र सैनिकांचा खडा पहारा असतो. जर या भागात एक ड्रोनही आला तर संपूर्ण सुरक्षा व्यवस्था सक्रिय होते. या इमारतीतील लॉकरचा दरवाजा 20 टन स्टीलचा बनलेला आहे. कुणी या लॉकरचा दरवाजा तोडण्याचा विचारही करू शकत नाही. इमारती भोवती कुंपण म्हणून बांधण्यात आलेल्या भिंतींवर विजेच्या सक्रिय तारा आहेत. या इमारतीभोवती तर दूरच, या परिसरात कोणीही प्रवेश करू शकत नाही. ही इमारत भूकंप, पूर आणि त्सुनामीपासून देखील पूर्णपणे सुरक्षित आहे. 1936 सोन्याचे साठे सुरक्षित ठेवण्यासाठी ही इमारत बांधण्यात आली होती. इमारतीच्या संरक्षणासाठी तिच्याभोवती जाड ग्रॅनाइटच्या भिंती बांधण्यात आल्या आहेत.