लंडन : जगभरात रुबी रोमन ग्रेप्ससारखी काही फळे अतिशय महाग असतात. तशाच प्रकारे काही भाज्याही महागड्या आहेत. आपण बाजारातून अनेक भाज्या विकत आणत असतो. भाजीपाल्यांचे दर थोडे वाढले की आपल्या किचनमधील बजेट कोलमडून जाते. मात्र, अशी एक भाजी आहे जी जगातील सर्वात महागडी भाजी आहे, जी खरेदी करणे आपल्याला शक्यही होणार नाही. जगातील या सर्वात महागड्या भाजीचे नाव ‘हॉप शूटस्’ आहे.
जगात विविध प्रकारच्या भाज्या आहेत. ज्या लोकांना आवडते, जसे कोबी, वाटाणे, पालक, शिमला मिरची, दुधीभोपळा आणि बरेच काही. या सर्व भाज्या अशा आहेत, जे कोणताही सामान्य माणूस खरेदी करू शकतो. या सर्व भाज्या भारतात सर्वाधिक पिकवल्या जाणार्या भाज्या आहेत आणि त्यांचा वापर भारतात सर्वाधिक आहे. मात्र, ‘हॉप शूटस्’ ही केवळ एक भाजी नसून तिचे अन्यही अनेक उपयोग आहेत. ‘हॉप शूटस्’च्या एक किलोची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. त्याची 1 किलोची किंमत सुमारे 85,000 रुपये आहे. ही भाजी प्रामुख्याने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, चीन, अमेरिका आणि युरोपमध्ये आढळते. भारतात तिची लागवड होत नाही. ही भाजी शंकूच्या आकाराची असते.
हॉप शूटस्ची फळे पाकळ्यांच्या थरांनी बनलेली असतात. एकदा पूर्ण विकसित झाल्यावर, त्याच्या फुलांची लांबी सुमारे दोन सेंटिमीटर असू शकते, ज्यांना शंकू म्हणतात. त्याची मुळे 2-3 मीटर खोल असतात. त्याची चव खूप मसालेदार आणि कडू आहे. त्यांच्या फांद्या ‘कोशिंबीर’ म्हणून वापरतात. याच्या फांद्या ‘सलाड’ म्हणून वापरतात. जगातील सर्वात महागड्या भाज्यांपैकी हॉप शूटस्चा वापर बिअर बनवण्यासाठीही केला जातो. त्याच्या वापरामुळे बीअरला अधिक फोम आणि सुगंध येतो. या कारणास्तव, अनेक देशांमध्ये त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्याची फुले बीअर बनवण्यासाठी वापरली जातात.