World’s Most Expensive Chocolates |चॉकलेट की सोन्याचा भाव? 'या' आहेत जगातील सर्वात महागड्या चॉकलेट्स 
विश्वसंचार

World’s Most Expensive Chocolates |चॉकलेट की सोन्याचा भाव? 'या' आहेत जगातील सर्वात महागड्या चॉकलेट्स

पुढारी वृत्तसेवा

जगाच्या पाठीवर चॉकलेटचे एकाहून अधिक प्रकार आणि तितक्याच वेगवेगळ्या चवीसुद्धा आहेत. त्यातही जगातील सर्वात महागडी चॉकलेट कोणती, माहिती येत?

फ्रोजन हॉटे चॉकलेट (Frrozen Haute Chocolate)

तब्बल २५ हजार डॉलर्सचे हे चॉकलेट मूळचं न्यूयॉर्कमधील असून, जगातील सर्वात महागड्या गो पदार्थांपैकी एक आहे. असं म्हणतात की, अतिशय दुर्मी ळ कोको फळं, दूध आणि आईस्क्रीमच्या मदतीनं फ्रोजन हॉटे चॉकलेट तयार होतं. ज्यावर खाण्यायोग्य २४ कॅरेट सोनंसुद्धा वापरलं जातं. अतिशय महागड्या सामग्रीच्या वापरामुळं आणि तितक्याच मौल्यवान पात्रात ते सर्व्ह केलं जात असल्यानं हे जगातील सर्वात महागडं चॉकलेट आहे.

ला मॅडेलिन वू ट्रफल (La Madeline au Truffe)

अमेरिकेतील Knipschildt Chocolatier यांच्याकडून ‘ला मॅडेलिन वू ट्रफल’ हे चॉकलेट तयार केलं जातं. त्यामध्ये Valrhona डार्क चॉकलेटचा वापर केला जातो. हेवी क्रीम, साखर, व्हॅनिला आणि दुर्मीळ French Perigord truffles च्या वापरातून हे चॉकलेट हातानं बनवले जातात. इथं कुठंही यंत्रांचा वापर होत नाही. तितक्याच आलिशान बॉक्समध्ये हे चॉकलेट बांधले जातात. या चॉकलेटची इतकी किंमत असण्यामागचं कारण म्हणजे त्यामध्ये वापरले जाणारे ट्रफल. या चॉकलेटचा एक तुकडा २५० डॉलर्सचा आहे.

टोक चॉकलेट (To'ak Chocolate)

इक्वेडोअरमध्ये तयार होणारं हे चॉकलेट Nacional cacao beans पासून तयार केलं जातं. ही जगातील एक अतिशय जुनी ककाओची प्रजाती आहे. असं म्हणतात की, या चॉकलेटचा प्रत्येक बार हा लाकडाच्या बॅरेलमध्ये एखाद्या वाईनप्रमाणं ठेवला जातो. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या ककाओमुळंच या चॉकलेटची किंमत इतकी जास्त आहे. या चॉकलेटच्या एका बारची किंमत ३०० ते ४०० डॉलर्स आहे.

डेबाँ अँड गॅलियास ले लिव (Debauve & Gallais Le Livre)

राजेशाही पाकशाळांमधील काही पाककृतींच्या मदतीनं Debauve & Gallais Le Livre हे फ्रेंच बनावटीचे चॉकलेट तयार केले जातात. ज्यामध्ये अतिशय उत्तम सामग्रीचा वापर केला जातो. एखाद्या कलाकृतीप्रमाणं हे चॉकलेट हाताळले जातात. त्यामध्ये वापरली जाणारी सामग्री आणि पॅकेजिंग तंत्रामुळं हे चॉकलेट अतिशय महाग असतात. याचा एक बॉक्स ५५० ते ६०० डॉलर्सचा असतो.

स्वारोव्हस्की स्टडेड चॉकलेटस्‌ (Swarovski Studded Chocolates)

कस्टम मेड श्रेणीत येणारी ही चॉकलेट लक्झरी गिफ्ट म्हणून श्रीमंतांच्या पसंतीस उतरतात. या चॉकलेटवर स्वारोव्हस्कीचे चमकणारे खडेसुद्धा जडवलेले असतात. २००८ मध्ये Harrods नं हे चॉकलेट लाँच केलं. या चॉकलेटच्या एका बॉक्समध्ये भारतातील सिल्क कापडात गुंडाळलेले hand wrapped ४९ चॉकलेटस्‌ असतात. या पॅकेजिंगमध्ये सोनं आणि प्लॅटिनमचा वापर केला जातो. या चॉकलेटचा एक बॉक्स दहा हजार डॉलर्सचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT