World Longest Straight Road | ‘या’ देशात आहे, जगातील सर्वात लांब सरळ रस्ता 
विश्वसंचार

World Longest Straight Road | ‘या’ देशात आहे, जगातील सर्वात लांब सरळ रस्ता

पुढारी वृत्तसेवा

रियाध : रस्त्यांच्या जाळ्याच्या बाबतीत अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र, जेव्हा जगातील सर्वात लांब ‘थेट सरळ’ (Straight Road) रस्त्याचा प्रश्न येतो, तेव्हा सौदी अरेबियाने बाजी मारली आहे. वळणरहित रस्त्यांच्या बाबतीत सौदी अरेबियातील महामार्ग जागतिक विक्रमांच्या यादीत आघाडीवर आहेत.

‘डेंजरसरोडस् डॉट ओआरजी’च्या अहवालानुसार, सौदी अरेबियातील हायवे 85 वर तब्बल 822 कि.मी. लांबीचा असा पट्टा आहे, जिथे एकही वळण नाही. वाळवंटातून जाणार्‍या अरार आणि अल नैरयाह या शहरांच्या दरम्यान हा रस्ता आहे. हा सरळ पट्टा पार करण्यासाठी सरासरी नऊ तासांचा वेळ लागतो. हा संपूर्ण महामार्ग 1,271 कि.मी. लांब असून, तो जुबैलला जॉर्डन सीमेजवळील कुरायतशी जोडतो. सौदी अरेबियातच हायवे 10 हा जगातील दुसरा सर्वात लांब सरळ रस्ता मानला जातो. सुमारे 256 कि.मी.पर्यंत यावर कोणतेही वळण नाही.

किंग फहद यांनी हा रस्ता आपल्या वैयक्तिक वापरासाठी बांधला होता. दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशातील लॅगेरेन्झा-एस्टिगारिबिया रोडवर 207 कि.मी.चा पट्टा सरळसोट आहे. रेल्वे मार्गाच्या बाबतीतही एक विक्रम नोंदवला गेला आहे. ऑस्ट्रेलियातील ‘नुलरबोर प्लेन’ मधून जाणारी रेल्वे लाईन जगातील सर्वात लांब सरळ रेल्वे लाईन मानली जाते. दक्षिण ऑस्ट्रेलियातील हा पट्टा 478 कि.मी. लांब असून, तो पूर्णपणे वळणरहित आहे. या भागातील ‘आयर हायवे’ हा रस्तादेखील ‘90 माईल स्ट्रेच’ या नावाने प्रसिद्ध आहे. अशा रस्त्यांवर प्रवास करणे रोमांचक असले, तरी सतत सरळ रस्ता असल्यामुळे वाहनचालकांना कंटाळा किंवा डुलकी येण्याचा धोका असतो, असा इशाराही तज्ज्ञांकडून दिला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT